नागपूर : चांगले शिकले की सरकारी नोकरी करून सुखात आयुष्य घालवायचे हे आजच्या युवकांचे स्वप्न. मात्र, विशाल यातला नव्हता. टिपिकल माणूस म्‍हणून सिव्हिल इंजिनिअरचा डिप्लोमा घेतला. राळेगाव येथील रहिवासी असलेला विशाल धनकसार याने त्यात (startup story) पॉलिटेक्‍निक केले. इतरांप्रमाणे त्याने बांधकाम क्षेत्रात अभियंता म्हणून कामही केले. त्याची नाळ मात्र व्यवसायाशी जुळली असल्याने मन स्वस्थ बसू देत नव्हते. काही तरी व्यवसाय करावा हे नेहमी वाटत असे. परंतु, नोकरी सोडून व्यवसाय करणे म्हणजे मोठी रिक्स. मात्र, पर्याय नव्हता. नोकरीत मन रमत नसल्याने व्यवसाय करण्याचा त्याने निर्णय घेतला अन् सुरू झाला गोटफार्मचा (Goatfarm business) व्यवसाय… (Vishal-Dhankasar-does-online-trending-of-goats)

गोटफार्मचा व्यवसाय करताना त्याच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला. घरी एक एकरही शेती नसताना गोटफार्म सुरू करणे म्हणजे मोठी रिक्स होती. विशालने गोटफार्म सुरू करून धाडसाचे काम केले होते. मात्र, यातून त्याने मार्ग काढला. सर्व समस्यांवर मात करीत सुरुवातीला पार्टनरशिपमध्ये गोटफार्म सुरू करायचे ठरविले. गोटफार्म हा अनस्टॉपेबल बिझनेस आहे.

Also Read: वडिलांकडे हट्ट धरून काम करा; नवनीत राणांनी कशासाठी लिहिले पत्र

पार्टनरच्या शेतात शेड उभे केले आणि व्यवसाय सुरू झाला. तरीही त्याच्यासमोरील व्यवसायातील आव्हान संपले नव्हते. व्यवसाय करण्यासाठी त्याला भांडवलाची गरज होती. दोन चार बॅंकांत कर्जासाठी प्रयत्न केल्यानंतर कटू अनुभव आला. शेवटी भांडवलाची समस्या सुटल्यानंतर विशालच्या जिवात जीव आला. त्याने व्यवसायाला सुरुवात केली. बरडगाव येथे डी ॲण्ड डी गोटफार्म ॲण्ड ऍग्रो सर्विसेस कंपनीची स्थापना केली. सोबतच बटेल पालनही सुरू केले.

व्यवसायाला चांगली सुरुवात झाली. लोकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. गावरान बकऱ्या शेतकऱ्यांना देत होता. शेतकऱ्यांनीही त्याच्या कामाला सहकार्य केले. हळूहळू व्यवसायात भरभराट येऊ लागली. व्यवसाय करताना गोटफार्ममध्ये उत्पन्न व नफा मिळण्यासाठी वेळ लागत होता. त्यामुळे त्याला व्यवसायातून नफा कमविण्यासाठी वाट पहावी लागली. दरम्यान, विशाल याने व्यवसायात भरभराट आणण्यासाठी नवनवीन लोकांसोबत भेटी घेऊ लागला. विशाल याने देशातील इतर व्यावसायिकांसोबत संपर्क केला. यातूनच ऑनलाइन ट्रेडिंग सुरू केले.

Also Read: राज्य सरकारला निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण नकोय

आनलाइन ट्रेडिंगचा त्याला चांगला फायदा झाला. जवळपास १०० व्हॉट्‌स ॲप ग्रुपशी कनेक्‍टेड आहे. या ग्रुपच्या माध्यमातून भारतभर गोटफार्म मालकांशी संपर्क साधता येतो. यातून ऑनलाइन ट्रेडिंगचे जाळे महाराष्ट्रभर विशालने विणले आहे. पंजाब, राजस्थान येथून माल घ्यायचा व शेतकऱ्यांना ऑनलाइन विक्रीचा व्यवसाय सुरू केला.

राळेगाव तालुक्यात चांगला प्रतिसाद

विशाल धनकसार हा होतकरू युवक आहे. त्याला व्यवसायात मोठी झेप घ्यायची आहे. अनेकांना तो व्यवसायासाठी मार्गदर्शनही करतो. गोटफार्मसोबत इतरही व्यवसायात उतरण्याची त्याची इच्छा आहे. त्याला सहकार्य करणाऱ्यांची मोठी यादी आहे. तो व्यवसायात निपुण आहे. त्यामुळेच तो बिनधास्त आहे. येणाऱ्या काळात या व्यवसायाला मोठे करण्यासाठी त्याचे प्रयत्न आहेत. राळेगाव तालुक्यात व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे तो म्हणतो.

Also Read: क्राईम पॅट्रोल बघूनच हत्याकांड; यु-ट्यूब हिस्ट्रीतून उलगडा

(Vishal-Dhankasar-does-online-trending-of-goats)

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here