पावसाळा सुरु झाला की अनेक दुकाने, मॉलमध्ये मान्सून सेल किंवा ऑफर्स सुरु झाल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे सहाजिकच अशा ठिकाणी खरेदीदारांची झुंबड उडाते. जर तुम्हीही मान्सून सेलमध्ये शॉपिंग करत असाल तर काही मुलभूत गोष्टींकडे लक्ष देण्याची किंवा काळजी घेण्याची गरज आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या खरेदीचं बजेट किती आहे ते ठरवा. तसंच ज्याची गरज लागणार आहे त्याच गोष्टींची यादी तयार करा. खरेदी करताना जे दिसेल ते घेऊ नका. जर त्या वस्तूची तुम्हाला खरंच गरज असेल तर घ्या. तसंच शक्यतो कपडे, बॅग्स, फूटवेअर यांची एकत्र खरेदी करु नका. खरेदी करताना कधीही जाणकार व्यक्तीला सोबत घेऊन जा. शक्यतो एकट्याने खरेदी करु नका. फसवणूक होण्याची जास्त शक्यता असते. सौंदर्यप्रसाधनांची खरेदी करताना त्यांची एक्सपायरी डेट आणि माहिती नीट वाचून घ्या. सेल लागल्यावर लगेच खरेदीची घाई करु नका. अनेकदा त्या सेलपेक्षा अन्य दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला दुसरी ऑफर मिळू शकते. सेलमध्ये ठेवलेला माल जुना तर नाही ना याची खात्री करा. सेलमधून कधीही खाद्यपदार्थांची खरेदी करु नका.