मल्हारपेठ (जि. सातारा) : पोलिस हे एक आपलं कुटुंब आहे ते जनतेचं रक्षण करत असतात त्यांच्या कुटुंबियांच रक्षण करणं हे सरकारच काम आहे. राज्यातील सर्व पोलिसांना राहण्याचे निवास्थान चांगल असाव म्हणून सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. (satara-news-uddhav-thackreay-ajit-pawar-shambhuraj-desai-online-bhoomipoojan-malharpeth-police-station)
मल्हारपेठ पोलिस ठाणे व पोलिस वसाहत इमारतीचा ई- भुमिपुजन समारंभ आज (गुरुवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलिस महासंचालक संजय पांडे, विवेक फणसळकर, गृहराज्यमंत्री (शहर) सतेज पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह आदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कार्यक्रमास उपस्थित हाेते. कार्यक्रमस्थळी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई, कोल्हापूर परिक्षेत्राचे मनोजकुमार लोहिया ,जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल , गृहनिर्माण अभियंता अलकनंदा माने उपस्थित होते.
Also Read: मरण उशाला घेऊन आणखी किती पावसाळे काढायचे?; ग्रामस्थांचा संतप्त सवाल
जनतेचे हित पाहणारे हे सरकार आहे हे माझ सरकार आहे ही भावना प्रत्येकाची असली पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कोरोना संसर्गाचा सामना आपण सर्वजण करत आहोत. या काळात महत्वाचा घटक म्हणून महाराष्ट्र पोलिसांचे काम जगभरात श्रेष्ठ ठरले आहे. कित्येक पोलिस बाधित झाले तरी माझ्या पोलिस बांधवानी हार मानली नाही. दुर्दैवाने यात काही कर्मचारी दगावले. महाविकास आघाडी सरकारने पोलिसांना वा-यावर न सोडता 50 लाखाचे सरंक्षण कवच दिले आहे. आता सणवार सुरु होत आहे. संसर्ग संपलेला नाही जनतेने काळजी घ्यावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
बाळासाहेब देसाई आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांचा ऋणानुबंध होता. तेही दिवस आठवतात. मी त्यावेळी लहान होतो. त्यावेळी त्यांच्याशी संवाद झालेला नाही. पण मी अनुभवत होतो. दोन बाळासाहेबांच्या मनात एकमेकांविषयी आदर आणि सन्मान होता, त्याची आज मला आठवण झाली असे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भाषणाचा दागा पकडत नमूद केले.
यामुळे शंभुराज देसाई यांच्या मागणीमुळे सातारा जिल्ह्याच्या वैभवात या दिमाखदार वास्तुची भर पडणार आहे. निवासस्थान आणि पोलिस स्टेशन इमारतीसह उपयुक्त कर्मचारी वर्ग देवून या तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी, पर्यटनातुन या विभागातील रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. क-हाड- चिपळूण आणी पंढरपुर- गुहागर या नवीन राज्य मार्गाच्या नूतनीकरणामुळे मल्हारपेठ बाजारपेठेला गतवैभव प्राप्त होणार आहे. लवकरच पाटण तालुक्यात भव्य पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या मान्यतेसाठी सरकर प्रयत्नशील असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
Also Read: कौतुकास्पद! सुळपणीच्या डोंगरावर प्राचीन पाण्याच्या टाक्यांचा कायापालट
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रेझेन्टेशनमध्ये दाखवलेला इमारतीचा रंग न आवडल्याने त्यांनी गृहनिर्माण विभागास रंग पाहिल्यावर समाधान वाटले पाहिजे असा टोला मारत इमारतीचा रंग बदलण्याची सूचना केली. सन 1995 पासूनच्या मागणीला ख-या अर्थाने आत्ता महाविकास आघाडी सरकाराच्याच प्रयत्नामुळे 20 कोटीचा निधी मिळाला आहे. महाराष्ट्र पोलिसांची कामगिरी जगात अव्वल आहे. पोलिस प्रशासनावरचा ताण कमी करण्यासाठी 12 हजार 500 कर्मचारी भरती सरकार करणार असल्याचे नमूद केले.
दरम्यान कसाब सारख्या दहशतवाद्याला जिवंत पकडण्याचे धाडस साताऱ्यातील पोलिस तुकाराम ओंबळे यांनी केले. सातारा पाेलिस दलाने काेविड 19 च्या पहिल्या लाटेत स्वतःच्या जीवावर उदार हाेऊन कामगिरी बजावल्याचे काैतुक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ते म्हणाले पाेलिसांनी वेळप्रसंगी अडीअडचणीतील लाेकांना स्वतःच्या घरातून जेवण, नाष्टा पूरविला आहे. पाेलिसांचे काम हे वाखण्याजाेगे असल्याचे त्यांनी नमूद केले.
Also Read: रंग बदलण्याचं सरकारमध्ये धाडस : उद्धव ठाकरे
प्रारंभी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मनाेगत व्यक्त केले. ते म्हणाले मल्हारपेठ हे मुख्य बाजारपेठेचे गाव असल्याने मल्हारपेठ येथे पोलिस ठाणे व्हावे अशी सर्वांची अपेक्षा होती. ठाण्याबरोबरच येथील कर्मचाऱ्यांसाठी वसाहत होत आहे, असे राज्यातील एकमेव उदाहरण असेल.
गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले, मल्हारपेठ येथे पोलिस ठाणे व्हावे यासाठी 1995 पासून प्रयत्न करीत आहे. राज्य शासनाने याला मान्यता देवून पोलिस ठाणे व वसाहतीसाठी निधी उपलब्ध करुन दिला. कोयनानगर येथे पोलिस प्रशिक्षण केंद्राचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावालाही मान्यता द्यावी. राज्य शासन पोलिस विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करीत आहे. अधिकारी, कर्मचारी यांच्या निवास्थानासाठी 700 कोटींपेक्षा जास्त रुपयांची अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आली आहे. गृहराज्यमंत्री पाटील म्हणाले, राज्याच्या भौगोलिक, आर्थिक व सामाजिक प्रगतीमध्ये पोलिस विभागाचा मोठा वाटा आहे. पोलिसांच्या वसाहतीचा प्रश्न शासनाने हाती घेतला आहे. पोलिस विभागासाठी भविष्यात आणखीन चांगले उपक्रम राबविण्यात येणार आहेत असे नमूद केले.
Esakal