नंदुरबार ः नवापुर शहरातील बीएसएनएल कार्यालयाजवळ धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर (Dhule-Surat National Highway) मधोमध एका गुजरात (Gujarat) पासींगची कारमध्ये १७ जूनला झालेला खून (Murder) अवैध मद्य व्यवसायाचा व्यहारातून (Liquor business) झाला असून याप्रकरणी नंदुरबार पोलिसांनी (Nandurbar police) दोघांना ताब्यात घेत बेडया ठोकल्या आहेत. त्यांनी खुनाची कबुली दिली आहे. ( police arrest two accused in surat merchant murder case)

Also Read: धुळे जिल्ह्यात केवळ 22 टक्के पेरणी

याबाबत घटनेची माहिती अशी, नवापुर शहरातील बीएसएनएल कार्यालयाजवळ धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर मधोमध एका गुजरात पासींगची कारमध्ये १७ जूनला एकाचा खून झाल्याचे दिसुन आल्याने स्थानिक नागरीकांनी तात्काळ पोलीसांना माहिती दिली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व नवापुर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अमंलदार यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली.कारच्या मागील सीटवर एका इसमाच्या हाता पायावर व तोंडावर धारधार शस्त्राने वार करुन तोंडावर प्लॅस्टिक चिकटपट्टी लावुन ठार मारले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरज महाजन यांच्या फिर्यादीवरुन नवापुर पोलीस ठाण्यात खूनाचा गून्हा नोंदविण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, उपविभागीय पोलीस अधीकारी सचिन हिरे, स्थाकिन गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराम गवळी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवुन बारकाईने पाहणी केली.तसेच अधिकाऱ्यांना पोलिस अधिक्षक श्री. पंडित यांनी मार्गदर्शक सुचना दिल्या.

Maharashtra police

पोलिसांसमोर होते आव्हान…

मयत कोण ? त्याला जिवेठार मारण्याचा उद्देश काय व मारेकरी कोण ,या प्रश्नांची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.मृत व्यक्तिच्या खिशात ऑनलाईन जेवणाची ऑर्डर पावती व त्यावरील त्याचा मोबाईल नंबर होता. त्यावरुन मयताची ओळख पटविण्यात पथकाला यश आले होते. मयत हा भावेशभाई सी. मेहता (रा. घनश्यामभाई सोसायटी, सुरत गुजरात राज्य ) असल्याचे स्पष्ट झाले. त्याचा घरी घटनेबाबत कळवुन त्यांना नवापूर येथे बोलविण्यात आले होते. मयताच्या भावाने त्यास ओळखल्याने मयताची खात्री झाली होती. परंतु मयत सुरतहुन नवापुर येथे का आला व त्याचे मारेकरी कोण ? का मारण्यात आले ? हे प्रश्न पोलीसांपुढे होतेच, म्हणून पोलीसांनी घटनेच्या आजु-बाजुच्या परीसरात तसेच नवापूर शहरातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सर्व हॉटेल, लॉजेस, पेट्रोल पंप येथील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले. त्यात नवापूर शहरातील हॉटेल कुणाल येथे मयत व त्यासोबत इतर ५ ते ६ इसम हॉटेलमध्ये प्रवेश करत असल्याचे दिसले. तसेच घटनेच्या दिवशी नवापूर येथील राष्ट्रीय महामार्गवरील हॉटेल उरविशा येथे देखील ते ५ ते ६ संशयीत दिसून आल्याने आरोपी निश्चीत झाले. मयत हा सुरत येथील असल्याने व मिळालेले सी.सी.टी.व्ही. फुटेजवरुन पोलीस अधीक्षक श्री. पंडित यांनी एक पथक सुरत येथे रवाना करुन वेळोवेळी माहिती घेत होते.

police

Also Read: भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून आला!

आरोपींचा ‘फिल्मी स्टाईल’ने घेतला शोध

पोलीस पथकाने सलग ३ दिवस सुरत शहरात बातमीदार तयार करुन सी.सी.टी.व्ही. फुटेजमध्ये दिसत असलेले संशयीत हे सुरत, नवसारी येथे दारुची अवैध तस्करी करणारे व पैसे घेवुन गुन्हा करणारे (सुपारी किलर) असल्याचे प्रथमदर्शनी माहिती मिळाली,त्याअनुषंगाने पोलीसांचे अजुन एक पथक तयार करुन नवसारी (गुजरात) येथे रवाना केले. सुरत येथील पथकाने एकाचे घर शोधुन काढले. घर परिसरात सलग ४ दिवस वेशांतर करुन पाळत ठेवली.१९जूनला संशयीताला सुरत शहर गुन्हे शाखेच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. त्याचे नांव आकाश रमेशभाई जोरेवार (वय-२१ रा. आंबेडकर नगर, सुरत) असे सांगितले. त्याचाकडून अधिक माहिती घेतल्यावर त्याने इतर साथीदारांची नावे सांगुन अवैध दारु तस्करीच्या व्यवसायातील वादातुन खून केला असल्याची कबुली दिली.त्यानंतर काल (ता.२३) गुन्ह्यातील आकाश अरविंदभाई ओड (वय-२८ रा. अंबिका नगर, सुरत) यास ताब्यात घेतले. दोन्ही आरोपीतांना नवापुर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असुन उर्वरीत आरोपीतांचाशोध सुरु आहे.

police

यांनी केली कामगिरी..

ही कामगिरी पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरज महाजन, संदीप पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, रविंद्र पाडवी, प्रमोद सोनवणे, मुकेश तावडे, जितेंद्र तांबोळी, पोलीस नाईक राकेश वसावे, विशाल नागरे, जितेंद्र ठाकुर, दादाभाई मासुळ, राकेश मोरे, जितेंद्र तोरवणे, मोहन ढमढेरे पोलीस अमंलदार राजेंद्र काटके यांचा पथकाने केली.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here