मैदानात आपल्या आक्रमक अंदाजाने ओळखला जाणारा कर्णधार विराट कोहली आणि केन विल्यम्सन यांच्या संघात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची पहिली वहिली फायनल झाली.
या स्पर्धेत बाजी मारल्यानंतर केन विल्यमसनने खास फोटो शूट केल्याचे पाहायला मिळाले. आयसीसीने अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन केनचे फोटो शेअर केले आहेत.
केन विल्यमसनचा मैदानाबाहेरील चॅम्पियनवाला रुबाब चांगलाच चर्चेत आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धावांचा पाठलाग करताना केन विल्यमसनने नाबाद अर्धशतकी खेळी केली. त्याला अनुभवी रॉस टेलरने उत्तम साथ दिल्याचे पाहायला मिळाले.
न्यूझीलंडच्या संघाला आयसीसीच्या स्पर्धेत जेतेपद मिळवून देणारा केन विल्यमसन हा पहिला कर्णधार ठरलाय.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here