

एक टॉवेल घ्या.तो टॉवेल गरम पाण्यातून बुडवून काढा आणि तो पिळून चेहऱ्याला लावून धरा .टॉवेलमुळे आपल्या चेहऱ्यावरील छिद्रे ओपन होतात. आणि यानंतर आपण त्याच्यावरती क्लींजिंग करू शकतो.

थोडा बर्फ घ्या.आणि तो चेहऱ्यावर ते पाच ते दहा मिनिटे लावून धरा. यामुळे चेहऱ्यावरील सूज आणि लालसर पणा कमी होईल. यानंतर एखादा चांगला कन्सीलर आणि फाउंडेशन लावून तुम्ही तुमचा पिंपल्स लपवु शकता.

चांगली टूथपेस्ट घ्या. आणि ती आपल्या चेहऱ्यावरती लावा. प्लास्टिकच्या कागदाने चेहरा बंद करा. कमीत कमी 15 मिनिटे चेहर्यावर राहू द्या. यानंतर चेहऱ्यावरील लेप काढून टाका. आणि थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या.

ग्रीन टी मध्ये असणाऱ्या अॅंटीऑक्सीडेंट मुळे चेहऱ्यावरील मुरूम काढण्यास मदत होते. गरम पाण्यामध्ये चहाची पिशवी म्हणजे ग्रीन टी ची पिशवी टाका ते पाणी गार झाल्यानंतर चेहऱ्याला पिंपल्सच्या ठिकाणी लावा.

मधात अॅंटीबॅक्टेरिया आणि अॅंटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे पिंपल्सच्या समस्येपासून मुक्तता मिळवण्यासाठी मदत करतात. पिंपल्सच्या ठिकाणी मध 1 किंवा 2 थेंब लावा. रात्रभर तसच ठेवा. सकाळी चेहरा धुऊन घ्या. लवकरच तुम्हाला फरक जाणवेल.

कोरफड केवळ मुरम काढण्यासाठीच नाही तर डाग घालवण्यासाठी देखील याचा वापर करतात. ज्या ठिकाणी मुरूम आहेत. त्याठिकाणी कोरफड लावा. काही दिवसातच मुरूम बरे होण्यास मदत होईल.

हळदीमध्ये अँटिबायोटिक गुणधर्म आढळतात. ज्यामुळे त्वचेचे अनेक प्रकारचे विकार दूर होतात.ओली हळद मुरूम असलेल्या ठिकाणी रात्रभर लावा आणि सकाळी चेहरा स्वच्छ धुवा. हळूहळू तुम्हाला मुरूम कमी होताना दिसतील.

Esakal