विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला न्यूझीलंडने पराभवाचा दणका दिला. या पराभवातून टीम इंडिया अजून सावरलीही नसेल तोपर्यंत आयसीसीने विराट कोहली आणि शास्त्री गुरुजींना आणखी एक दणका दिलाय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसंदर्भात आयसीसीने आपली भूमिका स्पष्ट केलीये. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल बेस्ट ऑफ थ्री घेता येणार नाही, असे आयसीसीने म्हटले आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा निकाल हा ‘बेस्ट ऑफ थ्री’ मध्ये घ्यावा, यावर चांगलीच चर्चा रंगली होती. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी देखील टेस्टमधील मेगा फायनलचा निकाल एका सामन्यावरुन न लावता तीन सामने खेळवण्याचा विचार करावा, असे म्हटले होते. (World Test Championship final Shock To Virat Kohli ICC Said Best of 3 Final Not Possible)

यासंपूर्ण चर्चेवर आता आयसीसीने आपली बाजू मांडली आहे. आयसीसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) ज्योफ एलाडिर्स यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसंदर्भात भूमिका मांडली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रक हे व्यस्त असते. फायनलसाठी दोन संघांना महिनाभर व्यस्त ठेवणे अशक्य आहे. त्यामुळेच एका दिवसाच्या कसोटी सामन्याची फायनल खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला, असे आयसीसीने स्पष्ट केले.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या माध्यमातून एक नवा बदल आपल्याला पाहायला मिळाला. दोन वर्षांत क्रिकेट जगतातील बेस्ट टेस्ट टीम निवडण्यासाठी आपल्याकडे एक कसोटी सामना आहे. त्यातील रंगत आपण अनुभवली आहे, असा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. याशिवाय 2024-31 पर्यंतच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा कार्यक्रम हा यावेळी प्रमाणेच एका कसोटी सामन्याची फायनल होणार हे देखील निश्चित करण्यात आले आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पावसाचा व्यत्यय आला. खराब वातावरणामुळे मेगा फायनल अनिर्णित अवस्थेत संपेल, असे वाटत होते. मात्र यात रंगत आणि विजेता या दोन्ही गोष्टा पाहायला मिळाल्या. क्रिकेट वर्तुळातील अनेक दिग्गजांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनलसाठी तीन सामन्यांची कसोटी मालिका असावी, असे म्हटले होते. पण ते शक्य नाही, असेच आयसीसीने म्हटले आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here