

मीठाशिवाय कोणताही पदार्थ पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे मीठ हा स्वयंपाक घरातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. विशेष म्हणजे पदार्थ टिकवण्यासाठीही मीठाचा वापर केला जातो. त्यामुळे जर मीठाची नीट साठवणूक केली तर ते वर्षानुवर्ष छान टिकून राहतं. तसंच त्याची चवही बदलत नाही.

चायनीज पदार्थांमध्ये आंबटपणा आणणाऱ्या व्हिनेगरला एक्सपायरी डेट नसते. त्यामुळे ते फ्रीजमध्ये वर्षानुवर्ष टिकू शकतं.

चीन, कोरिया,जपान या ठिकाणी सर्वात जास्त वापर होणारा सोया सॉसदेखील ३ वर्ष सहज टिकू शकतो. हवाबंद डब्यात भरुन हा सॉस फ्रेजमध्ये ठेवला तर तो आरामात ३ वर्ष राहू शकतो.

मध –
कधीही शिळा न होणारा पदार्थ म्हणजे मध. हवाबंद डब्यात मध बराच काळ राहू शकतो.

साखरदेखील वर्षभर छान टिकू शकते. मात्र, ती साठवताना प्लास्टिकच्या पिशवीत भरुन त्यात ५-६ लवंगा आवर्जुन घालाव्यात. त्यामुळे ती पावसाळ्यातही ओलसर किंवा चिकट होत नाही.


भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये तांदळाला विशेष महत्त्व आहे. आपल्याकडे तांदळापासून अनेक पदार्थ तयार करण्यात येतात. विशेष म्हणजे अनेक जण वर्षभरासाठीही तांदूळ साठवून ठेवतात. त्यामुळे जर तांदूळ नीट कडक उन्हात वाळवून, कोरड्या जागी ठेवले तर ते बरीच वर्ष टिकू शकतात.
Esakal