पुणे : कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक झालेल्या महाराष्ट्रातील((Maharashtra) नागरिकांनी लसीकरणात(vaccination) देशात आघाडी कायम ठेवली आहे. त्यामुळे लसीकरण महाराष्ट्र ‘नंबर वन’ (Number one)ठरल्याचे दिसते. देशातील सर्वात मोठे राज्य असलेले उत्तर प्रदेश (UP) दुसऱ्या स्थानावर असल्याचेही ‘कोव्हिन’च्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.(Maharashtra is Number one in vaccination)
देशात गेल्या वर्षीपासून कोरोना विषाणूंचा उद्रेक सुरू आहे. या वर्षी कोरोनाच्या साथीची दुसरी लाट उसळली. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक नागरिकरण झालेले राज्य आहे. त्याची लोकसंख्येची घनताही जास्त आहे. त्यामुळे कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग महाराष्ट्रात झाला. कोरोनाच्या या संसर्गाला नियंत्रित करण्यासाठी मास्क, सॅनिटाझर आणि ‘सोशल डिस्टसिंग’ या त्रिसूत्रीबरोबरच आता कोरोना प्रतिबंधक लशीही महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला महाराष्ट्रातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याची माहिती कोव्हिनच्या पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून दिसते.

देशातील कोरोनाच्या साथीचा झळ महाराष्ट्राला बसली आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी लस हे प्रभावी साधन असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. त्याचा थेट परिणाम लसीकरणाची संख्या वाढण्यात होत असल्याचे निरीक्षण आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी नोंदविले.
‘फुल व्हॅक्सिनेटेड’मध्येही बाजी
लशीचा पहिला आणि दुसरा डोस घेणाऱ्यांमध्येही महाराष्ट्राने बाजी मारली आहे. कोव्हिशिल्ड असो की कोव्हॅक्सिन त्या दिवशी उपलब्ध असलेल्या लशीचा पहिला डोस घ्यायला राज्यातील नागरिकांनी प्राधान्य दिले. त्यामुळे लसीकरणाची संख्या वाढली असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात लशीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या दोन कोटी ४० लाख २३ हजार ३३५ असून दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या ५७ लाख ३८ हजार ४२ आहे. ‘फुल व्हॅक्सिनेटेड’मध्ये दुसऱ्या क्रमांकावर गुजरात (५१ लाख ३८ हजार ८७९) आहे.
असे झाले राज्यात लसीकरण
पुरुष : १,२९,८८,८१७
स्त्रि : १,१०,३०,९२९
वयोगट ……….. लसीकरण
१८ ते ४४ ……. ७१,१७,७४२
४५ ते ६० …….. ९४,०५,९८५
६० पेक्षा जास्त … ७५,८०,३८८
”कोणालाही फोन केल्यानंतर लस घेण्याचे आवाहन करणारी ‘डायलर टोन’ लागलेली असते. त्यामुळे पहिली लस घेऊन बरोबर ८४ दिवस झाल्यानंतर दुसरी लस घेण्यासाठी केंद्रावर आलो.”
-दत्तात्रेय पागे, (वय ७८) सिंहगड रस्ता लसीकरण केंद्र
”मी अजून मतदान केले नाही. पण, भारताचा नागरिक म्हणून मी मतदानाच्या आधी लस घेत असल्याचा मला अभिमान आहे.”
– दीपक शिंदे, (वय २०)
”कोरोना प्रतिबंधक लशीचा डोस देणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. महाराष्ट्राने सातत्याने लसीकरण केले आहे. लशीचा पुरवठा कमी झाल्याने दरम्यानच्या काळात लसीकरणाचा वेग मंदावला होता. पण, आता पुरवठा होत असल्याने लसीकरणाचा पुन्हा वाढल्याचे दिसते.”
– डॉ. अर्चना पाटील, संचालक, सार्वजनिक आरोग्य खाते, महाराष्ट्र राज्य.
Esakal