सडावाघापुर (ता. पाटण, जि. सातारा) येथील उलटा धबधबा (रिव्हर्स पॉईंट) वर पर्यटकांचे आगमन होऊ लागले आहे. संपूर्ण राज्यभरातून तरुणाई इकडे धाव घेत आहे. जिल्हयातील पर्यटकांबरोबरच पुण्यामुंबईहून अनेक पर्यटक येथे येत आहेत. येथील निसर्गाचा अविश्कार पाहुन मंत्रमुग्ध होत आहेत.

धुक्यात हरवलेला रस्ता व कौलारु घरे पाहून मन आनंदित हाेऊन जाते.
सडावाघापूरला जाताना धुक्यात हरवलेल्या पवनचक्क्या येथे पहावयास मिळतात.
गगनचुंबी पवनचक्क्या
पठारावर कडयाशेजारी विस्तीर्ण तळे आहे. हे तळे भऱले की पाणी कडयाकडे वाहु लागते, तसेच पावसामुळे पठारावर पडणारे पाणी कडयावरुन शेकडो मीटर खोल दरीकडे धाव घेते. परंतु वाऱ्याच्या प्रचंड दाबामुळे यातील निम्मयाहुन अधिक पाणी उलटे पठारावरच फेकले जाते.
कडयावरुन खाली पडणारे पाणी वाऱ्याच्या प्रचंड दाबामुळे सुमारे शंभर फुटापर्यंत उलटे
पठारावर फेकले जाते.
धुके, थंडगार वारा, हिरवाईने नटलेला परिसर छोटेमोठे धबधबे याचा मनसोक्त आनंद पर्यटक घेतात. येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वर्षानुवर्षे वाढ होत आहे.
डोंगराच्या कडे कपारीतुन फेसाळत येणारे लहान मोठे धबधबे पाहून मन प्रसन्न हाेऊन जाते.
पाचगणीच्या धर्तीवरील विस्तीर्ण पठारावरील नजारा
सड़ावाघापुर येथून सूर्यास्त पाहूनच पर्यटक परतीच्या मार्गास निघतात.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here