नागपूर : ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख (ED raided on anil deshmukh house) यांच्या घरी छापा टाकला. त्यामुळे आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन (ncp agitation) सुरू केले आहे. याठिकाणी केंद्र सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात घोषणाबाजी केली असून या परिसरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला आहे. तसेच आंदोलक आक्रमक होऊ नये यासाठी पोलिसांची कुमक देखील तैनात करण्यात आली आहे. तसेच काही कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. (ncp party worker agitated due to ED raided on anil deshmukh house in nagpur)

Also Read: अनिल देशमुखांना अटक होणार? ‘ईडी’चे मुंबईच्या घरातही छापे

पोलिसांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धरपकड

ईडीचे एक पथक गुरुवारी रात्रीच नागपुरात दाखल झाले. त्यानंतर सकाळीच अनिल देशमुख यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली. अजूनही ही चौकशी सुरूच असून अनिल देशमुख स्वतः मात्र घरी नाहीत. त्यांची पत्नी आणि मुलगा घरी आहे. तसेच केंद्रीय राखीव पोलिस दलाला देखील तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, नागपूरसोबतच मुंबईतील घरावर देखील ईडीने छापा टाकला आहे. तसेच देशमुखांना ताब्यात घेणार असल्याची चर्चा रंगली आहे.

ईडीची छापेमारी ही महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. केंद्र सरकार हे सर्व सुडबुद्धीने करत आहे. सीबीआय ईडीचा गैरवापर करत आहे. याचा आम्ही विरोध करत आहोत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावलेले आरोप निराधार आहे, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

सीबीआयकडून 11 तास चौकशी

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने (CBI) 21 एप्रिल रोजी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या घरावर छापा टाकून सलग 11 तास चौकशी केली होती. त्यावेळी सीबीआयने अनिल देशमुखांच्या घरातील काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीाआयने गुन्हा दाखल करुन त्यांच्या घरावर छापेही मारण्यात आले होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here