इंग्लंडमधील लॉर्ड्सच्या मैदानात 25 जून 1983 रोजी कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिला-वहिला वर्ल्ड कप उंचावला होता. सलग दोन विश्वचषक जिंकलेल्या वेस्ट इंडिज संघाला कपिल पाजींच्या टीम इंडियाने 43 धावांनी पराभूत करत क्रिकेटच्या मैदानात नवा इतिहास रचला होता. वर्ल्ड कप फायनलमध्ये बलविंदर सिंग संधू, कपिल देव, यशपाल शर्मा आणि सुनिल गावसकर विकेट मिळवल्यानंतर जल्लोष करतानाचा क्षण क्रिकेटच्या मैदानातील हा क्षण अविस्मरणीय असाच आहे. वेस्ट इंडिज संघाची वर्ल्ड कप विजयाची हॅटट्रिक रोखून भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकून देणारे कपिल देव हे भारताचे पहिले कर्णधार ठरले होते. त्यांच्यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 आणि मर्यादित षटकांचा वर्ल्ड कप जिंकला आहे.भारतीय संघाच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर लॉर्ड्सच्या प्रेक्षक गॅलरीत दिसलेला नजाराभारतीय चाहत्यांनी मैदानात येऊन केला होता जल्लोष सुवर्ण क्षणाची अनुभूती देणाऱ्या या ऐतिहासिक विजयाने भारतीय क्रिकेटला विशेष उंची प्राप्त झाली. हा क्षण अविस्मरणीय असाच आहे.