नागपूर : भारत देशात क्रिकेट या खेळाला सर्वांत जास्त पसंती दिली जाते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला चाहत्यांनी देवाची पदवी दिली आहे. असे असले तरी फुटबॉल हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. हा मैदानी खेळ मुख्यतः हिरवळ असलेल्या मैदानात खेळला जातो. मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या गोलजाळ्यात चेंडू पोहोचवणे असे या खेळातील खेळाडूंचे उद्दिष्ट असते. गोलरक्षक वगळता इतर दहा खेळाडूंनी (richest-footballers) चेंडूला हात लावणे (football player) नियमबाह्य ठरते. जो संघ अधिक वेळा गोलजाळ्यात चेंडू (गोल करेल) तो संघ विजेता ठरत असतो. चला तर जाणून घेऊया सर्वांत लोकप्रिय खेळ असलेल्या फुटबॉलच्या विश्वातील सर्वांत श्रीमंत दहा खेळाडूंबद्दल… (These-are-the-richest-footballers-in-the-world)पॉल पोगबा – पॉल पोगबा हा मँचेस्टर युनायटेडकडून खेळणारा खेळाडू आहे. पॉलची एकूण संपत्ती दोन अब्ज ४८ कोटी इतकी आहे.

लिओनेल मेस्सी –
लिओनेल मेस्सी अर्जेंटिनाचा प्रसिद्ध फुटबॉलपटू आहे. तो फुटबॉल विश्वात चांगलाच प्रसिद्ध खेळाडू आहे. मेस्सी बार्सिलोनाकडून खेळतो. त्याची एकूण संपत्ती नऊ अब्जापेक्षा जास्त आहे.
क्रिस्टियानो रोनाल्डो – क्रिस्टियानो रोनाल्डोचे फुटबॉल विश्वास मोठे चाहते आहे. त्याने या खेळात चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. तो फुटबॉल क्लब जुर्वेटीसकडून खेळतो. क्रिस्टियानो पोर्तुगीज खेळाडू आहे. तो ८.५ अब्ज संपत्तीचा मालीक आहे.
नेमार ज्युनिअर – नेमार ज्युनिअर हा ब्राझीलचा खेळाडू आहे. बार्सिलोना ते पॅरिस सेंट-जर्मन असा त्याचा प्रवास आहे. नेमार ज्युनिअर हा सात अब्ज रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे.
काइली एम्बाप्पे – काइली एम्बाप्पे हा केवळ वीस वर्षांचा आहे. तो फ्रान्सचा खेळाडू आहे. पॅरिस सेंट-जर्मन बरोबर तो २०२२ पर्यंत खेळणार आहे. त्याची एकूण संपत्ती तीन अब्ज आहे.
मोहम्मद सालेह – मोहम्मद सालेह हा लिव्हरपूलकडून खेळतो. हा अष्टपैलू खेळाडू फिलिस्तीनचा आहे. त्याच्याजवळ जवळपास तीन अब्ज रुपये आहे.
पॉल पोगबा – पॉल पोगबा हा मँचेस्टर युनायटेडकडून खेळणारा खेळाडू आहे. पॉलची एकूण संपत्ती दोन अब्ज ४८ कोटी इतकी आहे.
एंटोनी ग्रीजमॅन – एंटोनी ग्रीजमॅन हा अटलांटिको मॅड्रिसचा खेळाडू आहे. त्याची एकूण संपत्ती दोन अब्ज ४० कोटी इतकी आहे.
गैरेथ बेल – गैरेथ बेल हा रियल मॅड्रिडकडून खेळतो. दोन अब्ज इतकी त्याची संपत्ती आहे.
रॉबर्ट लेवांडोव्स्की – रॉबर्ट लेवांडोव्स्की हा बायर्न म्युनिककडून खेळतो. तो दोन अब्ज ४ कोटी इतक्या संपत्तीचा मालक आहे.
डेव्हिड डी गिया – डेव्हिड डी गिया हा मॅनचेस्टर युनायटेडकडून खेळणारा खेळाडू आहे. तो जवळपास दोन अब्ज संपत्तीचा मालक आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here