नाश्ता, लंच, डिनर काहीही असो.. या वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आपल्या अन्नाची शान वाढवतात व आपल्याला एक वेगळाच आनंद देतात.
शेंगदाणा चटणी : भारतात ही चटणी सर्वच घरांत उपलब्ध असते. प्रत्येक खाद्यपदार्थासोबत खाण्यासाठी या चटणीचा वापर केला जातो. इडली, डोसाबरोबरही याची चव वेगळीच असते. तुम्ही ही चटणी 3-4 दिवस फ्रीजमध्ये ठेवून देखील खाऊ शकता.शेजवान चटणी : या चटणीला बाजारात मोठी मागणी असते, परंतु घरी देखील विविध प्रकारचा मसाला वापरुन ही चटणी सहजरित्या बनवू शकता व याचा आस्वाद घेऊ शकता.नारळ-कोथिंबीर चटणी : नारळ-कोथिंबीर चटणी ही लसणाचा तडका देऊन घरीच बनविली जाते. ही चवदार चटणी डोसा, पोहे, रवा डोसा आणि म्हैसूर मसाला डोस्यासोबत शेअर करु शकता.अननस चटणी (Pineapple chutney) : आंब्याप्रमाणेच अननस चटणीचीही स्वतःची अशी वेगळी चव आहे, जी सर्व वयोगटातील लोकांना खूश करते. आंबट-गोड चवीमुळे ही चटणी सर्व वयोगटातील लोकांनाही फार आवडते.टोमॅटो चटणी (Tomato chutney) : टोमॅटो चटणीची स्वतःची अशी वेगळी चव आहे. दक्षिण भारतीय पाककृतीमध्ये या चटणीला इडली, डोसा, उपमा आणि वड्यासोबत खायला दिले जाते.कच्च्या आंब्याची चटणी (Mango chutney) : या आंब्याची आंबट-गोड चटणी उन्हाळ्याच्या काळात घरी बनविली जाते. ही चटणी तुम्ही रोटी आणि पराठ्यासोबतही खाऊ शकता.टोमॅटो-कांदा चटणी (Tomato-onion chutney) : टोमॅटो-कांद्याची चटणी लसणात मिसळून घरी बनवली जाते. पण, तुम्ही ढाब्यावरही या स्वादिष्ट चटणीचा आस्वाद घेऊ शकतो.पुदिना चटणी : ही चटणी घरामध्ये सहजरित्या बनविली जाते. या चटणीचा सुगंध अन्नाची चव वाढवण्यास मदत करतो.चिंचेची चटणी (Tamarind chutney) : भारतीय न्याहरीत चिंचेला फार महत्व आहे. त्यामुळे ही चटणी पापड, समोसे, दही वडा आणि आलू टिक्कीसोबत खाऊ शकता.सफरचंद चटणी (Apple chutney) : सफरचंदाची चटणी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. ती चटणी तुम्ही स्नॅक्ससह खाऊ शकता.