जळगाव : कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटचे (Delta Plus variant) रुग्ण (Patient)आढळून आल्याने जळगाव जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊनचे (Lockdown) आदेश जारी करण्यात आले आहेत. सोमवार ते शुक्रवार अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने, हॉटेल्स दुपारी ४ पर्यंतच सुरु राहू शकतील. शनिवार व रविवारी ‘वीकेंड’ला अत्यावश्‍यक सेवा वगळता बाजारपेठ पूर्णत: बंद राहील. ( delta plus mini lockdow again in jalgaon district)

Also Read: जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग घटतोय

जिल्ह्यात ‘डेल्टा प्लस’ या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले असून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री उशिरा सुधारित निर्बंध जारी करत लॉकडाऊनचे आदेश काढलेत.

curfew

रात्रीची संचारबंदी पुन्हा
कोरोनाच्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी पुन्हा लागू करण्यात आली आहे. सायंकाळी ५ ते पहाटे ५ वाजेपर्यंत मेडिकल इमर्जन्सी वगळता कुणालाही विनाकारण फिरता येणार नाही. यात पोलिस, महसूल, आरोग्य, महापालिका, अग्निशमन, नगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सूट राहील. जमावबंदी आदेशानुसार लग्न, अंत्यविधीवगळता सायंकाळी ५ वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी एकावेळी ५ पेक्षा जास्त नागरिकांना जमण्यास बंदी असेल.

Also Read: १५ फुट अजगाराचा हल्ला..आणि डोळ्यासमोर शेळी केली फस्त

हे राहणार सुरु
– अत्यावश्‍यक सेवा पुरविणारी दुकाने म्हणजेच किराणा, दूध, बेकरी नेहमीप्रमाणे सुरु राहतील. पण, एकाचवेळी ५ पेक्षा अधिक ग्राहक नको
– मेडिकल दुकाने, रुग्णालये नेहमीप्रमाणे सुरु राहतील.
– हॉटेल, रेस्टॉरंट, बार ५० टक्के ग्राहक क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहू शकतील. ४ ते ९ यावेळेत हॉटेल पार्सलद्वारे सुविधा पुरवू शकतील.
– खुली मैदाने, सार्वजनिक ठिकाणे सायकलिंग व मॉर्निंग वॉकसाठी सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत सुरु राहतील.
– क्रीडा प्रकार, शुटींग, तत्सम स्पर्धांसाठी सकाळी ५ ते ९ ही वेळ असेल.
– लग्नसोहळ्यासाठी ५० व अंत्यविधीसाठी २० जणांची मर्यादा कायम असेल
– बांधकामाच्या ठिकाणी राहण्याची सोय असल्यास अशी बांधकामे सुरु राहतील, दुपारी ४ नंतर बांधकाम कामगारांना ये- जा करण्यास मनाई असेल
– ई-कॉमर्स सुविधा, कृषी संबंधी कामे, सार्वजनिक वाहतूक, मालवाहतूक, आंतरजिल्हा प्रवास उद्योग आदी सुरु राहतील

हे राहणार पूर्णपणे बंद
– शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था
– चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स, शॉपिंग मॉल आदी पूर्ण बंद राहतील

वीकेंडला पूर्ण बंद
किराणा, दूध, मेडिकल, बेकरी आदी जीवनावश्‍यक वस्तू व अत्यावश्‍यक सुविधांची दुकाने वगळता अन्य सर्व प्रकारची दुकाने शनिवार, रविवारी पूर्णपणे बंद असतील.

Also Read: ‘कोविड’मुळे अनाथ झालेल्या बालकांना मिळणार दरमहा मदत

दंडात्मक कारवाई करणार
नागरिकांनी अत्यावश्‍यक कामासाठी बाहेर पडताना मास्क लावणे, गर्दी न करणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आदी नियम पाळणे बंधनकारक आहे. हे नियम न पाळणाऱ्यास ५०० रुपये दंड करण्यात येणार असून ही कारवाई कठोर स्वरुपात राबविण्यात येणार आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here