जगभरात (World) अशी अनेक ठिकाणं आहेत, जी अतिशय धोकादायक (Dangerous) मानली जातात. येथे काय होईल हे कोणालाच सांगता येत नाही. आज आम्ही तुम्हाला जगातील अशाच काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे नेहमीच जीवाला धोका असतो. जगात बरीच सुंदर ठिकाणंही आहेत, जिथे लोक आपली सुट्टी एन्जाॅय करण्यासाठी जातात. मात्र, अशी काही ठिकाणं आहेत, जी खूपच धोकादायक मानली जातात. जिथं आपली एक छोटीशी चूक देखील आपल्याला खूप महागात पडू शकते. जगभरातील बर्‍याच धाडसी लोकांचा एक मोठा समूह आहे, जो या ठिकाणी साहसी कार्य करण्यासाठी येत असतो. या धोकादायक ठिकाणी बर्‍याच वेळा लोकांना आपल्या छोट्याशा चुकीमुळे प्राण गमवावा लागला आहे. दरम्यान, आपण जगातील अशा पाच ठिकाणांबद्दल जाणून घेऊ , जिथं जिवंत राहणं खूपच आव्हानात्मक समजलं जातं. (5 Most Dangerous Places On Earth Where Living Is Very Challenging Global Marathi News)

जगभरात अशी काही ठिकाणं आहेत, जी खूपच धोकादायक मानली जातात. जिथं आपली एक छोटीशी चूक देखील आपल्याला खूप महागात पडू शकते.

Sanaa Yemen

सना, यमन (Sanaa Yemen) : यमनमधील ‘सना’ शहर जगातील सर्वात धोकादायक ठिकाण मानलं जातं. येथे बर्‍याचदा दहशतवादी घटना आणि बॉम्बस्फोट घडत असतात. या व्यतिरिक्त पैसे देऊन लोकही मारली जातात. जरी, यमन देशाचे हे शहर ऐतिहासिक आणि सुंदर असले, तरी या शहराचे सौंदर्य पुसून टाकण्यासाठी सतत येथे दहशतवादी हल्ले होत असतात. तसेच ‘सना’ शहर राजकीयदृष्ट्याही अस्थिर असून बंडखोर व सरकारमध्ये नेहमीच तणावाचं वातावरण असतं. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने आपल्या नागरिकांना येथे जाण्यास मनाई केली आहे.

Grand Canyon USA

ग्रँड कॅनियन, अमेरिका (Grand Canyon USA) : अमेरिकेची ग्रँड कॅनियन ही जगातील सर्वात धोकादायक जागा आहे. बरेच लोक येथे येऊन आत्महत्या करतात. जिथं लोक जगात सर्वाधिक आत्महत्या करतात, त्या आधारावर या जागेचे नाव दुसर्‍या क्रमांकावर येतं. ग्रँड कॅनियन हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. मात्र, येथे मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत असल्याने या शहराकडे क्वचितच लोक पर्यटनासाठी येत असतात. तसेच येथील नदी किनारी अनेक जीवघेण्या घटना घडताहेत.

Danakil Desert Ethiopia

डानाकिल वाळवंट, इथोपिया (Danakil Desert Ethiopia) : इथोपियाचे डानाकिल वाळवंट हे पृथ्वीवरील सर्वात उष्ण ठिकाण आहे. इथले तापमान इतके गरम आहे, की कुठल्याही प्राण्याला येथून सहज प्रवास करणे फार कठीण जाते. येथील परदेशी संस्था लोकांना या ठिकाणी न भेटण्याचा इशारा देत असतात. इथोपिया आणि एरिट्रिया यांच्यातील मतभेदांमुळे या वाळवंटात लोकांचं अपहरण होण्याचा धोका देखील असतो. त्यामुळे या ठिकाणाला भेट देण्यास लोक घाबरत असतात.

Snake Island, Brazil

स्नेक आइलॅंड, ब्राझील (Snake Island, Brazil) : ब्राझीलमध्ये एक धोकादायक व्दीप आहे, जिथं कोणालाही जाण्याची हिम्मत होत नाही. या बेटाचं खरं नाव ‘इलाहा दा क्यूइमादा’ असून जगातील सर्वात धोकादायक साप या बेटावर आढळतात. या छोट्या बेटावर विविध प्रजातींचे 4000 हून अधिक साप आहेत. या शिवाय येथे वाइपर साप (Viper Snake) देखील आढळतात, ज्यांच्यात पक्षांसारखी आकाशात उडण्याची क्षमता आहे. या बेटावर सापांचा मोठ्या प्रमाणात वावर असून या सापांचा डंका इतका विषारी आहे, की माणसाला तो सहजरित्या संपवून टाकतो. त्यामुळे या ठिकाणी लोकांची वर्दळही फारच कमी आहे. याच धरतीवर ब्राझीलने या बेटावर येण्यास कडक बंदी घातली आहे.

5 Most Dangerous Places On Earth Where Living Is Very Challenging Global Marathi News

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here