रावेर : या वर्षी जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांनी (Banan Farmer) स्वप्रयत्नांनी सुमारे एक हजार ५०० कंटेनर्स केळी निर्यात (Export) केली. शासनाने (government) पॅकहाउस (Packhouse), प्रीकुलिंग चेंबर्स (precooling chambers)अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास जिल्ह्यातून १५ हजार कंटेनर्स केळी निर्यात होऊन देशाला परकीय चलनाचा (Foreign currency) फायदा होऊ शकेल, असा विश्वास युवा केळी निर्यात शेतकरी विशाल अग्रवाल यांनी व्यक्त केला. (demand for banana farmer export convenience government)
Also Read: दुबारा पेरणी टळली; भुसावळ तालुक्यात पावसाने शेतकरी सुखावला
मोहाडी (जि. नाशिक) येथील जाधव मंगल कार्यालयात शुक्रवारी (ता. २५) झालेल्या राज्यस्तरीय ‘विकेल ते पिकेल’ या शेतमाल निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कार्यशाळेत तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आपले सादरीकरण करून आपला ठसा उमटविला.
कृषिमंत्री दादा भुसे यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ अध्यक्षस्थानी होते. नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी जिल्हा कृषी उपसंचालक अनिल भोकरे, निर्यातदार केळी उत्पादक शेतकरी प्रेमानंद महाजन आणि प्रशांत महाजन (तांदलवाडी, ता. रावेर) व वरुण अग्रवाल उपस्थित होते.

पीपीटीद्वारे सादरीकरण
कार्यशाळेत विशाल अग्रवाल यांनी ‘केळीची निर्यात’ या विषयावर मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी पावर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे केळीचे उत्पादन, कापणी, पॅकिंग याबाबत सादरीकरण केले. श्री. अग्रवाल म्हणाले, की आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशच्या धर्तीवर येथील निर्यातदार केळी उत्पादक शेतकऱ्यांना फ्रूट केअरसाठी अनुदान मिळणे आवश्यक आहे.
Also Read: जळगावात पुन्हा ‘मिनीलॉकडाऊन’; काय सुरू, काय बंद! वाचा सविस्तर
…या सुविधा हव्यात
बड इंजेक्शन्स, बड स्प्रे, डी हॅडिंग, स्करटिंग बॅग आणि पॅड यासाठी अनुदान उपलब्ध करून दिल्यास अधिक दर्जेदार केळी विदेशात पोचण्यास मदत होईल आणि निर्यातीत वाढ होईल. तालुक्यातील रावेर, सावदा आणि निंभोरा रेल्वेस्थानकातून केळी उत्तर भारतात वाहतूक करण्याची व्यवस्था उपलब्ध आहे; पण रेफ्रिजरेटेड कंटेनर उपलब्ध करून दिल्यास त्याचा फायदा केळी उत्पादकांना होईल, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात दहा पॅक हाउस, किमान दोन-तीन प्रीकुलिंग चेंबर्स आणि कोल्ड स्टोरेज उभारण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने सहकार्य करावे, असेही आवाहन त्यांनी केले. या वेळी श्री. अग्रवाल यांनी मंत्री दादा भुसे यांना खानदेशची अवीट केळी भेट दिली.
Esakal