अनिल देशमुखांवरील कारवाईवर राऊतांनी व्यक्त केला संताप

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर खंडणी वसुलीला (Extortion) भाग पाडल्याचे आरोप माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh Letterbomb) यांनी केले होते. या आरोपांवरून शुक्रवारी ईडीने (ED) त्यांच्या विविध मालमत्तांवर छापेमारी (Raid) केली. मुंबईतील (Mumbai) तीन आणि नागपूरमधील (Nagpur) दोन अशा एकूण पाच ठिकाणी ईडीने छापा मारला अशी माहिती आहे. या छापेमारीत ईडीला काही महत्त्वाचे पुरावे (Evidence) मिळाल्यामुळे देशमुखांचे दोन्ही स्वीय्य सहाय्यक (PA) संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या दोघांना ईडीने अटक केली. ईडीची कारवाई तिथेच थांबलेली नसून ईडीने अनिल देशमुखांनादेखील समन्स (Summons) बजावले आहे आणि चौकशीसाठी (Inquiry) शनिवारी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या मुद्द्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली (Anil Deshmukh Extortion Case Parambir Singh Letterbomb ED Raids Shivsena Sanjay Raut Reaction)

Also Read: ईडीकडून अनिल देशमुखांना समन्स; चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

अनिल देशमुख

“अनिल देशमुखांच्या घरावर आणि कार्यालयावर ज्या छाडी पडल्या, त्याचे कारण भाजपची निराशा आहे. भाजपला सरकार बनवता आलेले नाही, त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. याच कारणास्तव महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना आणि मंत्र्यांनाही त्रास दिला जातोय. महाराष्ट्रातील तपास यंत्रणा खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतात हे साऱ्यांना माहिती आहे. पण शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्ही पक्षांच्या नेत्यांना मुद्दाम केंद्रीय तपास यंत्रणांकरवी लपेटण्याचे काम सूरू आहे. आम्ही पण बघून घेऊ”, अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपला इशारा दिला.

Also Read: मोठी बातमी – अनिल देशमुखांच्या दोन स्वीय सहाय्यकांना अटक

“देशात मजबूत विरोधी पक्षांच्या आघाडीची तयारी सुरू आहे, ती काँग्रेसशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. काँग्रेसला बाजूला ठेऊन कोणतीही विरोधी पक्षाची आघाडी आकार घेऊ शकणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मत आहे. शिवसेनेदेखील हेच मत सामनातून व्यक्त केले आहे. त्यामुळे या साऱ्या गोष्टींचा विचार सुरू आहे”, अशी माहिती राऊत यांनी दिली.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here