भडगाव : जळगाव जिल्ह्यात एकेकाळी कजगावची केळी (Banana) देशात प्रसिद्ध (Famous) होती. मात्र, काही वर्षांपासून भडगाव तालुक्यातील केळीचे क्षेत्र कमी झाले, पण तालुक्यातील वडधे येथील शेतकरी ईश्वरसिंग पाटील यांनी केळी इराणमध्ये (Iran) निर्यात (Export) केली आहे. ते परदेशात केळी निर्यात करणारे तालुक्यातील पहिले शेतकरी ठरले आहेत. त्यामुळे गिरणा पट्ट्याच्या केळीच्या लौकिकात भर पडली आहे. (bhadgaon taluka farmer banana export by iran country)

Also Read: जळगावच्या वॉलपेंटिंगची दिल्लीलाही भुरळ; युद्धभूमी सुशोभित करणार

भडगाव नगर परिषद हद्दीतील वडधे (जुने) येथील शेतकरी ईश्वरसिंग पाटील शेतात केळीचे चांगले उत्पन्न काढत आहेत. त्यांची केळी व्यापाऱ्याच्या माध्यमातून इराणमध्ये रवाना झाली. ईश्वरसिंग पाटील यांच्याकडे एकूण साडेसहा एकर शेती आहे. ते दर वर्षी कमी-अधिक प्रमाणात केळीची लागवड करतात. त्यांनी यंदा दोन एकर क्षेत्रात महालक्ष्मी नामक केळीच्या चार हजार खोडांची लागवड केली आहे. पाचोरा येथील व्यापारी इम्तियाज शेठ यांनी त्यांच्या शेतात येऊन मालाची पाहणी केली. त्यांच्या शेतातील केळी कटाई करून इराणमध्ये पाठविण्याचा निर्णय घेतला. शेतातील ३६५ केळीच्या झाडांची कटाई करून ९० क्विंटल माल पॅकिंग करून इराणला पाठविला.

शेतकऱ्यांकडून कौतुक
ईश्वरसिंग पाटील यांच्या शेतातील केळी इराणमध्ये निर्यात केली जात असल्याची माहिती मिळताच जुने वडधे, नवीन वडधे परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांनी त्यांच्या शेतात गर्दी केली व त्यांचे कौतुक केले. तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या.

Also Read: सुविधा द्या..१५ हजार कंटेनर केळी निर्यात करू!

मागील २५ वर्षांपासून काळ्या आईच्या कुशीत मी परिवारासोबत घाम गाळत आहे. आपणही शेतात प्रयोग करून उत्पादन परप्रातांत, विदेशात पाठवावे, असे माझे स्वप्न होते. आज माझ्या शेतातील केळी व्यापाऱ्याच्या माध्यमातून इराणमध्ये जात आहे. यामुळे माझे स्वप्न पूर्णत्वास आल्याचा आनंद आहे.
-ईश्वरसिंग पाटील, शेतकरी वडधे, ता. भडगाव

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here