देशमुखांऐवजी वकिलाची ईडी कार्यालयात हजेरी
मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना खंडणी वसुली (Extortion) प्रकरणाच्या चौकशीसाठी ईडीने (ED) समन्स (Summons) बजावले होते. शनिवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी (Inquiry) हजर राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले होते. पण सकाळी ११ च्या सुमारास अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर न राहता त्याजागी त्यांच्या वकिलांनी कार्यालयात हजेरी लावली. अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर राहणार नाहीत. त्यांना नीट रितसर (Essential Documents) माहिती दिली जावी आणि पुढील वेगळी तारीख (Revised Date) दिली जावी, अशी मागणी करणारे पत्र (Letter) ईडीला देण्यात आल्याचे वकिलांनी सांगितले. (Anil Deshmukh 100 crores Extortion Case Parambir Letterbomb Advocate demands Revised date for inquiry by ED)
Also Read: ईडीकडून अनिल देशमुखांना समन्स; चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
परमबीर सिंह यांच्या लेटरमॉबॉम्बमुळे अनिल देशमुखांना ईडीचा सामना करावा लागतो आहे. त्याच प्रकरणात ईडीने चौकशीसाठी अनिल देशमुखांना बोलावले होते. सकाळी ११ वाजताच्या सुमारास ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश अनिल देशमुखांना देण्यात आले होते. मात्र अनिल देशमुखांच्या ऐवजी त्यांचे वकिल कार्यालयात हजर झाले. आम्ही ईडीकडे पत्र देऊन चौकशीला हजर राहण्याबाबत पुढील तारखेची वेळ मागितली आहे, असं ते म्हणाले.
अनिल देशमुख यांच्या वकिलांनी दिलेल्या पत्रात लिहिलंय की, माझा (देशमुखांचा) जबाब काल ईडीने नोंदवून घेतला. माझे वय ७२ वर्षे असून मी अनेक सहव्याधींनी (Co-Morbid) ग्रस्त आहेत. काल माझी जी चौकशी झाली त्यामुळे मला खूप थकवा जाणवतो आहे. तसेच, ज्या केसबद्दल माझी चौकशी करण्याचा विचार आहे त्याच्याशी माझा संबंध नसून माझ्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत.

Also Read: मोठी बातमी – अनिल देशमुखांच्या दोन स्वीय सहाय्यकांना अटक
“आम्ही ईडीच्या कार्यालयात गेलो होतो. ईडीने ज्या संदर्भात समन्स बजावला आहे, त्याची कोणतीही कागदपत्रे ईडीकडून आम्हाला देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे कोणत्या गुन्ह्यांच्या संदर्भात चौकशी केली जाणार आहे ते स्पष्ट करण्यात आलेले नाही. आम्हाला याची नीट रितसर कल्पना नाही. केंद्रीय तपास यंत्रणेकडून जाणीवपूर्वक दबाव टाकला जात आहे. आम्ही त्यांच्याकडून ईडीकडून अधिकची माहिती आणि चौकशीसाठी पुढील तारीख मागितली आहे”, अशी माहिती अँड जयवंत पाटील यांनी दिली.
Also Read: ईडीकडून अनिल देशमुखांना समन्स; चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
Esakal