‘माझा होशील ना’ Majha Hoshil Na या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता विराजस याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचा आहे.

विराजस आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे Shivani Rangole एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. त्यातच विराजसने पोस्ट केलेला हा फोटो म्हणजे त्याने दिलेली जाहीर प्रेमाची कबुलीच समजली जातेय.
शिवानीसोबतचा रोमँटिक फोटो पोस्ट करत विराजसने त्याला ‘ओह माय गॉड’ असं कॅप्शन दिलं आहे.
त्यावर अखेर गर्लफ्रेंडसोबतचा फोटो पोस्ट केलाच ना, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरच्या लग्नात या दोघांनी एकत्र हजेरी लावली होती आणि एकाच रंगसंगतीचे कपडे परिधान केले होते.
तेव्हापासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे.
विराजससोबतच्या अफेअरच्या चर्चांवर शिवानी ‘ई टाइम्स टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती, “होय, आमच्यात खूप चांगली मैत्री आहे आणि आम्हाला एकमेकांचा सहवास खूप आवडतो. पण लोकांनी माझ्या आणि विराजच्या नात्याबद्दल बोलत राहावं, चर्चा करत राहावी आणि मनमोकळेपणाने अंदाज वर्तवले जावेत असं मला वाटतं. कारण त्यात एक वेगळीच मजा आहे.”

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here