ओबीसी समाजाचे रद्द झालेले राजकीय आरक्षण व विविध प्रश्नांसंदर्भात महाविकास आघाडीचा निषेध करत भाजपकडून राज्यभर आंदोलन केले जात आहे.

कोल्हापूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.
मविआ सरकारने अटक केली किंवा आंदोलन करण्यापासून रोखले, तरी देखील आमचा हा लढा सुरूचं राहील असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.
नागपूरमध्ये विरोधी पक्षनेते देंवेद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. फडणवीस यांच्यासह कार्यकर्त्यांसह पोलिसांनी ताब्यात घेतलं.

पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे आणि पिंपरीमध्ये आंदोलन करण्यात आले. पुण्यातून पिंपरीमध्ये आंदोलन करण्यास गेल्यानंतर पंकजा मुंडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा जी यांच्या नेतृत्वाखाली नरिमन पॉईंट येथील आंदोलन करण्यात आले.
भाजप नेते प्रवणी दरेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
ठाण्यात महाविकास आघाडी सरकारचा निषेध करत भाजपने आंदोलन केले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here