श्रीलंका दौऱ्यात अनुभवी शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियासमोर मोठे आव्हान असेल. नवोदित खेळाडूंच्या साथीने धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वनडे आणि टी-20 मालिका खेळणार आहे. आयपीएल स्पर्धेदरम्यान कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातून खेळताना दिसलेला मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती कोरोना पॉझिटिव्ह आला होता. तोही कोरोनातून सावरुन स्पर्धेसाठी सज्ज झालाय. राजस्थान रॉयल्सच्या संघातील चेतन सकारियाने आयपीएल स्पर्धेतील लक्षवेधी कामगिरीच्या जोरावर टीम इंडियात स्थान मिळवले आहे. गोलंदाजीत त्याच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा असेल. श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. आगामी दौऱ्यासाठी संघातील नवोदित खेळाडून जीममध्ये कसून सराव करत आहेत. देवदत्त पदिक्कल आणि कृष्णापा गौतम या दोघांनी जीममधील सरावानंतर अशी पोझ दिलीपुण्याचा ऋतूराज गायकवाडही टीम इंडियात पदार्पणासाठी सज्ज झालाय. आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज कडून त्याने लक्षवेधी कामगिरी करुन दाखवली असून आगामी स्पर्धेत त्याला किती सामन्यात संधी मिळणार आणि तो कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या कर्णधारपदी शिखर धवनची तर उप-कर्णधारपदी भुवनेश्वर कुमारची निवड करण्यात आली आहे. ही दोघ फुटबॉल सामन्याचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.