देशभरात कोणत्या ना कोणत्या भागात मॉन्सून आणि मॉन्सूनपूर्व (Monsoon Season) पावसाची जोरदार बरसात होत आहे. हवामान खात्यातर्फे (Meteorological Department) दररोज पावसाचा इशाराही देण्यात येत आहे.
देशभरात कोणत्या ना कोणत्या भागात मॉन्सून आणि मॉन्सूनपूर्व (Monsoon Season) पावसाची जोरदार बरसात होत आहे. हवामान खात्यातर्फे (Meteorological Department) दररोज पावसाचा इशाराही देण्यात येत आहे. सध्या दक्षिण-पश्चिम देशातील बर्याच भागात मान्सून सक्रिय झाला आहे, परंतु उत्तरेकडील प्रदेशांपर्यंत पोहोचण्यात त्याचा वेग अगदीच कमी झालाय. नेपाळ आणि बिहारमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) बर्याच ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तर झारखंड, बंगाल आणि पूर्व भारतामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.मुंबईसह (Mumbai) देशात अशी अनेक क्षेत्र आहेत, जिथं सततच्या मुसळधार पावसामुळे पाणी साचण्याची समस्या निर्माण झालीय. यामुळे जनजीवनावरही परिणाम निर्माण होत आहे. परंतु, जगभरात अशी काही ठिकाणं आहेत, जिथं वर्षभरात सर्वाधिक पाऊस पडतो. आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला भारतासह जगातील अशा ठिकाणांविषयी सांगणार आहोत, जिथं सर्वात जास्त पाऊस पडतो.क्रोप्प नदी, न्यूझीलंड (Cropp River, New Zealand) : न्यूझीलंडमधील क्रोप्प नदी 9 किलोमीटर लांबीची आहे. या देशात हवामान जरी कोरडे असले, तरी क्रोप्प नदीच्या सभोवतालच्या भागात मुसळधार पाऊस पडत असतो. येथे वर्षाकाठी 11,516 मिमी पावसाची नोंद होते.टटेंडो, कोलंबिया, दक्षिण अमेरिका (Tutendo, Colombia, South America) : दक्षिण अमेरिकेतील कोलंबियाचे तापमान बर्यापैकी गरमच असते, परंतु येथे अशी काही क्षेत्र आहेत, जी पावसासाठी परिचित आहेत. कोलंबियामधील टटेंडो नावाच्या छोट्याशा ठिकाणी वर्षाकाठी 11,770 मिलीमीटर पाऊस पडत असतो.मासिनराम, मेघालय (Mawsynram Meghalaya) : भारताच्या मेघालयातील मासिनराम या गावात जगात सर्वाधिक पाऊस पडतो. मासिनराम हे एक हिल स्टेशन देखील आहे. जिथं बंगालच्या उपसागरातून येणारे ढग हिमालयातील शिखरे रोखतात आणि हे ढग पाऊस पडतात. येथे सरासरी वार्षिक पाऊस 11,871 मिलीमीटर इतका होतो.चेरापुंजी, मेघालय (Cherrapunji Meghalaya) : चेरापुंजीला मासिनराम इतकाच पाऊस कोसळत असतो. जे मसिनरामपासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. जगात सर्वाधिक पाऊस कोसळ्यात चेरापुंजीचा दुसरा क्रमांक लागतो. दरवर्षी येथे सुमारे 11,777 मिलीमीटर पाऊस पडतो. उन्हाळ्याच्या हंगामातही येथील तापमान 23 अंशांपर्यंत जाते आणि पावसाळ्याचे आगमन होताच, येथील वातावरण मुसळधार पावसामुळे थंड होते.सॅन अँटोनियो, आफ्रिका (San Antonio, Africa) : सॅन अँटोनियो डी युरेका याला ‘यूरेका व्हिलेज’ म्हणूनही ओळखले जाते. या गावाचा जगातील सर्वात नामांकित गावच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. येथे वर्षाकाठी 10,450 मिमी पाऊस पडत असतो.