सातारा : जिल्ह्यातील महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचार थांबविण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे (Deputy Chairman Dr. Neelam Gorhe) यांनी केल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस विभागाने (Satara Police Department) विविध विभागांचा सहभाग घेऊन चांगले रोल मॉडेल तयार करावे, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी केल्या. (Minister Shambhuraj Desai Informed That The Atrocities Against Women In Satara District Will Be Stopped Satara Marathi News)

महिला दक्षता समित्यांचे पुर्नरचना, महिला अत्याचार रोखणे, बालकांवरील अत्याचार रोखणे याबाबत पोलीस विभागाच्या वतीने पथदर्शी प्रकल्प सातारा जिल्ह्यात राबविण्याबत येणार आहे.

महिला दक्षता समित्यांचे पुर्नरचना, महिला अत्याचार रोखणे, बालकांबाबतचे अत्याचार रोखणे याबाबत पोलीस विभागाच्या वतीने पथदर्शी प्रकल्प सातारा जिल्ह्यात राबविण्याबत येणार आहे. त्याचा आढावा आज गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांनी शासकीय विश्रामगृहात घेतला. या बैठकीला पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, (Superintendent of Police Ajay Kumar Bansal) अतिरिक्त पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे, जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास अधिकारी मनोज ससे आदी उपस्थित होते.

Also Read: ‘जोपर्यंत आरक्षण पुनर्स्थापित होत नाही, तोपर्यंत सरकारला झोपू देणार नाही’

Satara Police Department

महिला व मुलींवरील अत्याचार रोखण्याबाबत पथदर्शी प्रकल्प जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. पथदर्शी प्रकल्प विविध विभागांचा समावेश घेऊन चांगल्या पद्धतीने तयार करा. अधिवेशन संपात ह्या प्रकल्पाचे रॉल मॉडेल विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना दाखविण्यात येईल. हा प्रकल्प जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात केल्यानंतर त्याचे दोन ते तीन महिन्यात परिणाम दिसतील. यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचनाही गृह राज्यमंत्री देसाई यांनी बैठकीत केल्या.

Minister Shambhuraj Desai Informed That The Atrocities Against Women In Satara District Will Be Stopped Satara Marathi News

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here