नाशिक : मान्सून लांबला असला तरी मागील काही दिवसात त्रंबकेश्वर परिसरात पावसाच्या सरी चांगल्या बरसल्याने भाताच्या पेरणी केलेल्या रोपांची आवणी साठी चांगली वाढ झाल्याने त्रंबकेश्वर परिसरात पाणथळ ठिकाणी भाताच्या आवणीला सुरुवात झाली आहे.

मान्सून लांबला असला तरी मागील काही दिवसात त्रंबकेश्वर परिसरात पावसाच्या सरी चांगल्या बरसल्याने भाताच्या पेरणी केलेल्या रोपांची आवणी साठी चांगली वाढ झाल्याने त्रंबकेश्वर परिसरात पाणथळ ठिकाणी भाताच्या आवणीला सुरुवात झाली आहे.
त्रंबकेश्वर तळवाडे शिवारात बाळासाहेब वारुंगसे यांच्या
१५० एकर भात क्षेत्रावर तयार झालेले रोपांची भात लावणीसाठी पोषक वाढ झालेले रोपांची आवणी साठी शेतात १५० मजूर मोठ्या उत्साहात भाताचे रोपांची आवणी करत आहेत.
भाताच्या लावणीची तयारी सुरू असल्याच्या लगबगीचे दृश्य बघून लॉकडाऊन नंतर शेती कामांचा हंगाम सुरू झाल्याचे चित्र त्रंबकेश्वर परिसरात सध्या बघावयास मिळत आहे.
आदिवासी भागातील शेतमजूर,कष्टकरी गोरगरीब रोजच्या मजुरी कामधंदयावर अवलंबून असणाऱ्यांना २५० रुपये रोज मिळू लागल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.
मजुरांना घरपोहच २५० रुपये रोज मिळत असून कोरोना महामारी मुळे बेरोजगारी आणि उपासमारीची वेळ ओढवून त्यावर मात करीत आज तरी हाताला काम मिळू लागले आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here