नाशिक : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ईतर मागासवर्गियांच्या संदर्भातील माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर न केल्याने राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा आरोप करत आज भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या वतीने विल्होळी नाका येथे पक्षाच्या सरचिटणीस व आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले. सुमारे अर्धातास झालेल्या या आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. (BJP-agitation-about-OBC-reservation-nashik-political-news)

मविआ सरकारच्या विरोधात आंदोलन : आमदार फरांदे

गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालात इतर मागासवर्गिय समाजाचे राजकीय आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावरून भाजपच्या ओबीसी मोर्चाने आक्रमक भुमिका घेत राज्यभर चक्काजाम आंदोलन केले. नाशिक मध्ये नाशिक-मुंबई महामार्गावर विल्होळी नाका येथे आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारचा निषेध करत महामार्ग बंद पाडण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी केला. १२ डिसेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला ओबीसी आरक्षणासंदर्भात काही सुचना केल्या होत्या. त्यात राज्य मागासवर्गीय आयोगाचे गठन करावे, राज्यातील ओबीसी समाजाचा इम्पेरीयल डाटा संकलित करावा व तत्काळ न्यायालयाला सादर करावा. या महत्वाच्या मुद्यांचा समावेश होता. परंतू राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सुचनेची अंमलबजावणी न केल्याने व ओबीसी आरक्षणासंदर्भात निष्काळजीपणा दाखविल्याने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द करण्याचा दुर्देवी निर्णय देण्यात आला. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आल्याचे आमदार फरांदे यांनी सांगितले.

Police arrest BJP protesters

पोलिसांकडून आंदोलकांना अटक

आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर विल्होळी नाका येथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आमदार फरांदे यांच्यासह प्रमुख आंदोलकांना अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलना दरम्यान एका बाजुची वाहतुक ठप्प झाली होती. यावेळी आंदोलकांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणा बाजी केली. ‘दादागिरी नही चलेगी, आरक्षण आमच्या हक्काचं’, ‘आघाडी सरकारचं करायचं काय…’ आदी घोषणा देण्यात आल्या.

Also Read: OBC Reservation : नाशिक जिल्ह्यात भाजपचे चक्काजाम आंदोलन

आमदार फरांदे यांच्यासह शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, महापौर सतिष कुलकर्णी, आमदार सीमा हिरे, आमदार ॲड. राहुल ढिकले, भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, संघटन सरचिटणीस, नगरसेवक प्रशांत जाधव, जेष्ठ नेते विजय साने, ओबीसी मोर्चा नाशिक महानगर अध्यक्ष चंद्रकांत थोरात, ओबीसी मोर्चा सरचिटणीस सतिष रत्नपारखी, प्रणव शिंदे, राजेश दराडे, उत्तम उगले, गोविंद घुगे, सुनिल आडके, गणेश कांबळे, प्रा. शरद मोरे, अमोल इगे, शिवाजी बरके, अविनाश पाटील, देवदत्त जोशी, भास्कर घोडेकर, सुनील देसाई, ॲड. अजिंक्य साने, संतोष नेरे, नगरसेविका छाया देवांग, माधुरी बोलकर, भगवान दोंदे, राकेश दोंदे, माधुरी पालवे, डॉ मंजुषा दराडे, अर्चना दिंडोरकर, नंदकुमार देसाई, विशाल जेजुरकर, सोमनाथ बोडके, चारुदत्त आहेर, ऋषिकेश आहेर, फिरोज शेख, सचिन हांडगे, प्रतीक शुक्ल, प्रशांत वाघ, पवन उगले आदी उपस्थित होते.

(BJP-agitation-about-OBC-reservation-nashik-political-news)

Also Read: नाशिकमधील सर्व मॉल्स सोमवार पासून बंद : जिल्हाधिकारी मांढरे

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here