UEFA Euro 2020 : युरो कप स्पर्धेतील नॉक आउट राउंडमधील लंडन येथील वेब्ली स्टेडियमवर रंगलेल्या (Wembley Stadium in London) दुसरा सामना अपेक्षेपेक्षा रंगतदार झाला. कमकुवत वाटणाऱ्या ऑस्ट्रियाने स्पर्धेतील प्रबळ दावेदार मानला जाणाऱ्या इटलीला तगडी फाईट दिली. पहिल्या 90 मिनिटात ऑस्ट्रियाने सामना गोलशून्य बरोबरीत रोखला. यात त्यांनी एक गोलही डागला. पण ऑफ साईडमुळे त्यांना आघाडी मिळाली नाही. अखेर सामना 30 मिनिटाच्या एक्स्ट्रा टाईममध्ये पोहचल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांच्या हाफमध्ये इटलीने दोन गोल डागत क्वार्टर फायनलमधील आस जागवली. अखेरच्या क्षणात ऑस्ट्रियाने एक गोल डागला. इटलीने सामना 2-1 असा जिंकत शेवटपर्यंत कडवी झुंज देणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या स्पर्धेतील प्रवासाला ब्रेक लावला.

या सामन्यात 11 मॅच आणि 1169 मिनिटानंतर इटलीने प्रतिस्पर्ध्याकडून गोल खाल्ला. सामन्यातील एक्स्ट्रा टाईममधील 94 व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून आलेल्या फेडरिको सिजाने (Federico Chiesa) केलेल्या अप्रतिम गोलने इटलीली दिलासा दिला. त्यानंतर बदली मॅटिओ पेसिना (Matteo Pessina) याने 105 व्या मिनिटाला दुसरा गोल डागत झुंजारु ऑस्ट्रियाला दबावात टाकले. अखेरच्या काही मिनिटांचा खेळ बाकी असताना लुई स्काउब (Louis Schaub) याने कॉर्नरची मिळालेली संधी अप्रतिम हेडरने गोलमध्ये बदलली. पण हा गोल ऑस्ट्रियाचा स्पर्धेतील प्रवास कायम ठेवण्यास पुरेसा ठरला नाही.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here