पुणे – पार्किंग (Parking) नसलेल्या ठिकाणी तुम्ही वाहन लावले आणि पोलिस (Police) येत नाहीत, म्हणून निश्चित होऊन कामावर जात असाल, तर जरा इकडे लक्ष द्या! तुमच्या वाहनाचे छायाचित्र एखाद्या नागरिकाने ट्विटर, व्हॉटस्‌ॲप, वाहतूक पोलिसांचे ‘महाट्रॅफिक ॲप’ (Mahatraffic App) टाकले, तर तुम्हाला दंड (Fine) झाल्याशिवाय राहणार नाही. मागील सहा महिन्यातच वाहतूक शाखेने ट्विटर, व्हॉटस्‌ॲप, महाट्रॅफिक ॲप व सीसीटीव्हीद्वारे पावणे नऊ लाख वाहन चालकांवर दंडात्मक कारवाईचा (Crime) बडगा उगारला आहे. (Traffic Police will take Action Against Violators Through Social Media)

कोरोना लॉकडाउन हळूहळू शिथिल झाल्यानंतर शहरातील रस्त्यांवर वाहतूक वाढली आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होण्याचे प्रमाण वाढले आहे. ‘नो पार्कींग’च्या ठिकाणी वाहने उभी करणे, ट्रिपल सीट, हेल्मेट परिधान न करणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहने थांबविणे आणि सिग्नल तोडण्याचे प्रकार अनेक वाहन चालकांकडून घडत आहेत. अनेकदा दुकाने, घरे, कार्यालयांसमोरील मोकळ्या जागांवर वाहने पार्क केली जातात. शहराच्या मध्यवर्ती भागात व उपनगरांमध्येही हे चित्र दिसून येत आहे.

Also Read: पुण्यात काय सुरू, काय बंद? हॉटेल, दुकाने 4 पर्यंतच, मॉल पुन्हा बंद!

बेकायदा पार्किंग, अनोळखी किंवा संशयास्पद वाहन परिसरात लावल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांना वाहतूक शाखेने ट्ठिटर, व्हॉटस्‌ॲप किंवा ‘महाट्रॅफिक ॲप’वर छायाचित्र पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मागील सहा महिन्यांत ट्विटरद्वारे आलेल्या तक्रारींवरून २९७, तर व्हॉट्सॲपद्वारे आलेल्या तक्रारीवरून २७२ वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली.

‘महाट्रॅफीक ॲप’वर आलेल्या दोन हजार ७६७ तक्रारींची दखल घेऊन संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ‘सीसीटीव्ही’द्वारे लक्ष ठेवले जात असून गेल्या सहा महिन्यांत एकूण ८ लाख ८५ हजार ७७६ वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

Also Read: पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; पुणे विद्यापीठाचा निर्णय

कार्यालयात जाताना घाईगडबडीत सिग्नलचे माझ्याकडून उल्लंघन झाले. त्यानंतर मला रीतसर दंड भरावा लागला. पोलिसांनीही यापुढे नियमांचे उल्लंघन न करण्याची ताकीद दिली. त्यानंतर मी पुन्हा वाहतूक नियमांचे कधीही उल्लंघन केले नाही.

– प्रसाद साळवे, नोकरदार

नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे; अन्यथा पोलिसांकडून कारवाई केली जाते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची माहिती सतर्क नागरिक व्हॉटस्‌ॲप, ट्विटर, महाट्रॅफिक ॲपद्वारे पोलिसांना देतात. त्यावरुन संबंधित वाहनचालकांवर तत्काळ दंडात्मक कारवाई केली जाते.

– राहुल श्रीरामे, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here