सातारा (जि. सातारा) : सातारा जिल्ह्यात शासकीय व खासगी कोविड रॅपिड अँटीजन टेस्ट (covid19 Rat Test) तपासणी केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत. या तपासणी केंद्रांत संशयित रुग्णांचे नमुने घेतल्याची शासकीय पोर्टलवर दैनंदिन ऑनलाइन नोंदणी करून आयसीएमआर (ICMR) आयडी तयार केल्याशिवाय रिपोर्ट देऊ नयेत असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. (satara-shekhar-sinh-orders-labs-covid19-reports)

सातारा जिल्ह्यात काही लॅबमध्ये संशयित रुग्णांना तोंडी किंवा त्यांच्या लेटरहेडवर लेखी स्वरूपात रॅपिड अँटीजन टेस्ट रिपोर्ट दिले जात असल्याचे आढळून आले आहे. या रुग्णांची ऑनलाइन पोर्टलवर विहित मुदतीत नोंद केली जात नसल्यामुळे जिल्हास्तरावर जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा परिषद येथे रिपोर्टिंग करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

Also Read: माणला दुसर्‍या लाटेचा जोरदार तडाखा; ‘माणदेश’कडून लाखमोलाची मदत

या बाबी प्रशासकीयदृष्ट्या गंभीर स्वरूपाच्या असल्याने सर्व खासगी लॅब संस्थांनी त्यांच्याकडे होणाऱ्या रॅपिड टेस्टचे रिपोर्ट देताना रुग्णांची ऑनलाइन पोर्टलवर नोंद करून आयसीएमआर आयडी तयार केल्याशिवाय संबंधितांना रिपोर्ट देण्यात येऊ नयेत. जे खासगी लॅबधारक रॅपिड टेस्टचे रिपोर्ट आयसीएमआरच्या पोर्टलवरून डाऊनलोड करून न देता त्यांचे स्वत:च्या लॅबच्या लेटरपॅडवर अथवा अन्य मार्गाने रिपोर्ट संबंधितांना दिल्याचे आढळल्यास संबंधिताविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, तसेच संबंधित लॅब सील करून परवाना रद्द करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी सिंह यांनी आदेशात म्हटले आहे.

Also Read: सातार्‍यावर मोदींचं विशेष प्रेम; खासदार उदयनराजे पंतप्रधानांना भेटणार

दरम्यान शनिवारी जिल्ह्यात 1005 कोरोना बाधितांची वाढ झालेली आहे. याबराेबरच 18 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर शनिवार अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 25 (8465), कराड 246 (26904), खंडाळा 38 (11685), खटाव 158 (19289), कोरेगांव 73(16559), माण 56(13059), महाबळेश्वर 20(4245), पाटण 37(8318), फलटण 69 (28192), सातारा 224 (39893), वाई 44 (12563) व इतर 5 (1290) असे एकूण 190462नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

Testing

याबराेबरच मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर शनिवार अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (192), कराड 8(794), खंडाळा 0 (149), खटाव 1 (479), कोरेगांव 0 (380), माण 1(256), महाबळेश्वर 1 (45), पाटण 1 (194), फलटण 0 (280), सातारा 4 (1222), वाई 1(330) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4321कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here