कऱ्हाड (जि. सातारा) : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कोणत्याही पॅनेलच्या सांगता सभेला परवानगी दिलेली नाही. कोविडमुळे शनिवारी व रविवारी संपूर्ण लॉकडाउनचे आदेश असल्याने त्याचे कडक पालन करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश आहेत. त्याचे पालन न करणाऱ्यावर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांनी दिला आहे. (satara-news-krishna-sugar-factory-election-2021-ranjit-patil)

रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २९) मतदान आहे. त्यापूर्वी चोवीस तास आधी म्हणजे सोमवारी (ता. २८) जाहीर प्रचाराची सांगता होत आहे. त्यादिवशी प्रचार सांगता घेता येणार नसल्याने उद्या (रविवारी) सांगता सभा घेण्याचे नियोजन केले आहे. मात्र, त्या एकाही सभेला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. त्या सभा जिल्हाधिकारी व राज्य शासनाने शनिवारी व रविवारी जाहीर केलेल्या कडक लॉकडाउनच्या कचाट्यात अडकल्या आहेत. कारखान्याच्या निवडणुकीत सहकार, संस्थापक व रयत पॅनेलमध्ये थेट लढत होत आहे. त्या तिन्ही पॅनेलच्या सांगता सभा कोरोनामुळे जाहीर केलेल्या आजच्या (रविवार) जमावबंदीमुळे अडचणीत आल्या आहेत.

Also Read: मानाच्या दहा पालख्यांत साताऱ्याच्या पाच विणेकरांचा समावेश

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘कोरोनामुळे वीकेंड (शनिवार व रविवार) लॉकडाउन आहे. त्यामुळे जमावबंदीही लागू आहे. त्यामुळे आज (रविवार) कोणत्याही पॅनेलच्या जाहीर सभा घेता येणार नाहीत किंबहुना आम्ही तशी कोणालाच परवानगी दिलेली नाही. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात अशा सभा घेताच येणार नाहीत. असे आम्ही निवडणूक लढविणाऱ्या तिन्ही पॅनेलसह सर्व उमेदवारांनाही लेखी कळवले आहे. त्यातूनही अशा सभा कोणी घेतल्या किंवा घेण्याचा प्रयत्न जरी केला, तरी त्याबाबत गुन्हे दाखल करणार आहोत.’’

Krishna Sugar Factory

या निवडणुकीसाठी येत्या मंगळवारी मतदान असल्याने सोमवारी सकाळी आठ वाजता प्रचार सांगता होणार आहे. तसे कळवले आहे. सांगता सभा कोरोनामुळे घेता येणार नाहीत, तरीही त्याची परवानगी द्यायची की नाही, हे पोलिस ठरवतील. त्याबाबत तेच निर्णय घेणार आहेत असे प्रकाश आष्टेकर (निवडणूक निर्णय अधिकारी, कृष्णा कारखाना) यांनी स्पष्ट केले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here