सातारा : देशाला कुस्तीत पहिले पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव (kshabha jadhav), धावपटू ललिता बाबर (lalita babar) यांच्यापाठोपाठ आता सातारा जिल्ह्याचा ऑलिंपिकमध्ये झेंडा रोवणारे प्रवीण रमेश जाधव (pravin jadhav) हे तिसरे ऑलिंपिकपटू ठरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी आज (रविवार) त्यांच्या 78 व्या मन की बातमध्ये खडतर परिश्रमातून यश मिळवित टोकियो ऑलिम्पिकमध्ये (tokyo olympics) सहभागी हाेणा-या खेळाडूंचा उल्लेख केला. आपल्या संवादाच्या प्रारंभीच पंतप्रधान माेदींनी साता-यातील सरडे (ता. फलटण) येथील प्रवीण रमेश जाधव याचे काैतुक केले. (mannki-baat-pm-modi-cheers-indian players-pravin-jdahav)

पंतप्रधान माेदी म्हणाले अत्यंत संघर्षमय जीवन जगत प्रवीणने आर्चरी (archery) या खेळात अतुलनीय कामगिरी केली आहे. त्याची टोकियो ऑलिम्पिकमधील निवड ही केवळ त्याच्या पालकांसाठी अभिमानास्पद गाेष्ट नव्हे तर आपल्या सर्वांसाठी आहे.

Also Read: हताश झालो, डगमगलो नाही; ऑलिंपिकला देशाचा झेंडा फडकविणारच!

माेदींनी प्रवीणचे काैतुक करुन त्याच्या आई-वडीलांनी त्यास मजूरी करुन वाढविले. त्याला उत्तम शिक्षण दिले आहे. आई-वडीलांच्या कष्टाचे चीज प्रवीणने केले आहे. प्रवीणचे जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. खेळाडूंकडे साधन सामुग्री नसताना देखील त्यांनी मिळविलेले यश आदर्शवत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी देशातील बहुतांश खेळाडूंची उदाहरणे देत संर्षमय जीवनानंतर मिळालेले यश खूप आनंद देऊन जाते असेही स्पष्ट केले. यावेळी पंतप्रधान माेदी यांनी स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

Also Read: ऑलिंपिकवीर खाशाबा जाधवांचा अपमान महाराष्ट्र अजून किती सहन करणार?

दरम्यान सरडे सारख्या ग्रामीण भागातील प्रविण जाधव या खेळाडूची निवड ही केवळ महाराष्ट्र नव्हे तर देशासाठी अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी केले. श्री. नाईक यांनी प्रवीण जाधव यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार केला. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी महेश खुटाळे, सुनिल कोळी, क्रीडा मार्गदर्शक संभाजी जाधव आदी उपस्थित हाेते.

फलटण तालुक्यातील खेळाडूंसाठी प्रविण जाधव आयडाँल आहे. त्याचा सारख्या खेळाडूची गरज देशाला आहे. त्यांच्या आई वडीलांनी केलेले कष्ट खरोखरच नवीन पिढीला प्रेरणादायी आहे. त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या जिल्हाधिकारी यांच्याकडे मांडल्या जातील असे तालुका क्रीडा अधिकारी महेश खुटाळे यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी माजी सरपंच दत्ता भोसले, रामदास शेंडगे, क्रिडाशिक्षक आप्पासाहेब वाघमोडे, उपसरपंच महादेव विरकर, ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव, बापूराव शेंडगे, शरद भंडलकर, आण्णा भंडलकर, संतोष भोसले, पूजा शेंडगे, ऐश्वर्या बेलदार यांच्यासह खेळाडू व ग्रामस्थ उपस्थित होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here