बॉलिवूडमधील कलाकार आपली खरी नावं ज्योतिषांनी दिलेल्या सल्ल्यानुसार बदलतात, तर अनेक वेळा या कलाकरांच्या चित्रपटांचे दिग्दर्शक आणि निर्माते त्यांना नाव बदलायला सांगतात. या कलाकारांच्या चाहत्यांना त्यांची बदललेली नावेच माहित असतात. पाहूयात अशाच काही कलाकारांची खरी नावे.

बॉलिवूडचा ‘नवाब’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सैफ अली खानचे खरे नाव साजिद अली खान असे आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे खरे नाव अश्विनी शेट्टी आहे.
आपल्या अभिनयाने आणि डान्सच्या स्टाईलने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा कलाकार टायगर श्रॉफचे खरे नाव जय हेमंत श्रॉफ असे आहे.
बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगणचे खरे नाव विशाल विरू देवगण आहे.
‘तेरे नाम’ आणि ‘दिलने जिसे अपना’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री भूमिका चावलाचे खरे नाव रचना चावला असे आहे.
अभिनेता सनी देओलचे खरे नाव अजय सिंग देओल असे आहे.
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे खरे नाव राजीव ओम भाटिया आहे.
अभिनेत्री महिमा चौधरीचे खरे नाव रितू चौधरी आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here