चला जाणून घेऊ मधुमेहाच्या रुग्णांना आपल्या आहारात कोणत्या पौष्टक खाद्यांचा समावेश करायला हवे. त्यातून आजारावर नियंत्रण मिळवले जाऊ शकते.

बीट : विविध संशोधनात दावा करण्यात आला आहे, की टाईप – २ मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी बीट आरोग्यदायी आहे. ते मधुमेहाचा धोका कमी करतो. बीट फायबर, खनिज, पोटॅशियम, लोह आणि मॅग्निज आदींचा समृद्ध स्त्रोत आहे. या तत्त्वांमुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
गाजर : गाजरात कमी ग्लायसेमिक इंडेक्सबरोबर कार्बची कमी मात्रा आढळते. मधुमेह रुग्णांना कमी जीआय व्हॅल्यू असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे गाजर खाल्ल्याने मधुमेहासारख्या आजारावर नियंत्रण मिळवले जाऊ शकते.
पालक : पालक फायबरचे एक समृद्ध स्त्रोत आहे. ते पचण्यास अधिक वेळ घेतो. पालक एक बिगर स्टार्चयुक्त भाजी आहे. यात ग्लायसेमिक इंडेक्सही कमी असते. पालकात कार्बोहायड्रेटही फार कमी प्रमाणात आढळते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
पेरु : पेरुत जीवनसत्त्व अ, फाॅलेट आणि पोटॅशियम मिळते. पेरुत ग्लायकेमिक इंडेक्स अर्थात जीआय असते. यामुळे मधुमेह नियंत्रित करण्यास मदत होते.
संत्री : संत्र्यासह सर्व आंबट फळे नेहमी सुपरफूड मानले जातात, असे तज्ज्ञ सांगतात. कमी ग्लायसेमिक इंडेक्ससह सलाड किंवा घरी बनवलेल्या संत्र्याच्या रसने मधुमेहावर नियंत्रण मिळवले जाऊ शकते. मधुमेहापासून वाचण्यासाठी तुम्ही त्याचा समावेश आहारात करु शकता.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here