आपण सर्वजण निरोगी राहण्यासाठी हेल्दी फूडपासून ते वर्कआउटसुद्धा करत असतो. हे स्वत: ला अधिक अक्टिव्ह ठेवण्यात मदत करतात. आजकाल प्रत्येकजण आपले वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आणि स्वत: ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी वर्कआउट करत आहे. वर्कआउटचा विपरीत परिणाम आपल्या त्वचेवर होऊ नये, यासाठी काळजी घेतली पाहिजे.

मुरुम होण्याची शक्यता :

वर्कआउटवेळी तुम्ही कोणाबरोबर तुमचा टॉवेल्स शेयर करणे टाळा. तसेच टॉवेल्स वापरल्यानंतर तो बदला आणि वापरण्यापूर्वी धुवा आणि वाळवा.
तुमच्या चेहऱ्यावर, पाठीवर मुरुमांचा सामना होऊ नये यासाठी या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका.

रॅशेज येणे :

ओलावा आणि उष्णतेमुळे बॅक्टेरिया होऊ लागतात. हे बुरशीचे (फंगस) आणि (जर्म्स) जंतूंसाठी तितकेच योग्य आहे. अशा परिस्थितीत वर्कआउटनंतर लगेच कपडे बदलले नाही तर रॅशेज येऊ शकतात. यासाठी वर्कआउट करण्यासाठी योग्य कपडे निवडले पाहिजे.

उदा. योगा आणि पायलेटसाठी स्ट्रेचेबल कपडे घाला आणि अन्यथा अन्य वर्कआउटसाठी सैल आणि आरामदायक कपडे घाला.

स्किनवर स्क्रॅचेस येणे :

जर तुम्ही वर्कआउटनंतर त्याच कपड्यांमध्ये असाल तर स्किन सोलली जाण्याची भीती देखील असू शकते. तसेच बॅक्टेरियामुळे तुम्हाला त्वचेवर खाज सुटते. अशा परिस्थितीत जेव्हा त्वचेवर स्क्रॅच येतात तेव्हा त्वचेवर लालसरपणा आणि तीव्र जळजळ होण्याची शक्यता असते. एवढेच नाही तर यामुळे काहीवेळा स्किनची सालही निघते.

शरीरामधून दुर्गंधी येणे :

जेव्हा तुम्ही वर्कआउट करताना घाम येतो आणि त्याच घामाच्या कपड्यांमध्ये राहिले तर ते घामामुळे येणारी दुर्गंधी शरीराबाहेर पडणे अवघड होऊन बसते. वर्कआउट केल्यानंतर आपण बॅक्टेरियांना आवडत्या दोन गोष्टी देतो ते म्हणजे ओलावा आणि उष्णता. तर जीवाणू तुमच्या अंडरआर्म्स आणि बाकीच्या जागेवर बॅक्टेरिया वाढतात आणि ते लगेच साफ न केल्यास शरीरामधून दुर्गंधी येऊ शकते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here