

कोरडी त्वचा, त्वचेवरील साल निघणे यासारख्या समस्येवर आपण अनेकदा पेट्रोलिअम जेली लावत असतो. हीच पेट्रोलिअम जेली चप्पल लागल्यावर किंवा चावल्यावरही उपयोगी पडू शकते. त्यामुळे ज्या ठिकाणी जखम झाली आहे. तो भाग स्वच्छ धुवून त्यावर पेट्रोलिअम जेली लावावी.

अॅस्पिरीनची गोळी किंचितशा पाण्यात विरघळून ती पेस्ट जखमेवर लावा. पेस्ट वाळल्यानंतर कोमट पाण्याने पाय स्वच्छ धुवा.

सौंदर्यप्रसाधने तयार करताना वापरण्यात येणाऱ्या रबिंग अल्कोहोलमुळेदेखील शू बाईटचा त्रास कमी करता येतो. या रबिंग अल्कोहोलमुळे पायाची होणारी जळजळ व दुखणं कमी होतं.

शू बाईटचा त्रास होत असल्यास त्या ठिकाणी कापसाच्या सहाय्याने बटाट्याचा रस लावा.

कापसाच्या बोळ्यावर थोडंसं खोबरेल तेल घेऊन ते जखम झालेल्या ठिकाणी लावा म्हणजे लगेच आराम मिळेल.

जखम झालेल्या भागावर ताजा कोरफडाचा रस किंवा कोरफड जेल लावू शकता. त्यामुळे जखम लवकर भरते व काळे डागही पडत नाहीत.

भाजलं, चटका बसला तर आपण त्यावर लगेच बर्फ लावतो. तसंच या बर्फामुळे आता शू बाईटमुळे होत असलेली जळजळदेखील मी करता येईल. जखम झालेल्या ठिकाणी थोडा वेळ बर्फाने मालिश करा. त्यामुळे पायाला आराम मिळेल.

आतापर्यंत तुम्ही टूथपेस्टचा वापर केवळ दात घासण्यासाठी केला असेल. मात्र, आता या पेस्टच्या वापराने पायाची जखमदेखील बरी करता येऊ शकते. शू बाईट झालेल्या भागावर पांढऱ्या पेस्टचा हलका थर लावा आणि ३० मिनीटे तसं ठेवून द्या. त्यानंतर कोमट पाण्याने हा लेप काढून टाका.
Esakal