England Women vs India Women 1st ODI : इंग्लंडमधील ब्रिस्टलच्या मैदानात इंग्लंड आणि भारतीय महिला संघ यांच्यात वनडे सामना रंगला आहे. इंग्लंड महिला संघाची कर्णधार हेदर नाईट हिने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. स्मृती मानधना आणि शफाली वर्मा या दोघींनी भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केलीय. शफाली वर्माचा हा पदार्पणातील सामना आहे. कसोटीमध्ये ज्याप्रमाणे तिने दोन्ही डावात अर्धशतकी खेळीसह दमदार डेब्यू केला तसेच वनडे पदार्पण करेल, अशी आस आहे. कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाच्या खाईतून काढणारी स्नेह राणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही.

23-1 : शफालीच्या रुपात भारतीय महिला संघाला पहिला धक्का, पदार्पणाच्या सामन्यात शफाली 3 चौकाराच्या मदतीने 14 चेंडूत 15 धावा करुन माघारी. कॅथरीन ब्रंटच्या गोलंदाजाीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात तिने अन्या श्रुबसोलेकडे दिला झेल

असा आहे इंग्लंड महिला संघ

लॉरेन विनफिल्ट हिल, टॅमी ब्यूमॉन्ट, हेदर नाईट(कर्णधार), टॅमी ब्यूमॉन्ट, हेदर नाईट (कर्णधार), नताली सायव्हर, अ‍ॅमी एलेन जोन्स(विकेट किपर),सोफिया डन्कले, कॅथरीन ब्रंट, सारा ग्लेन, सोफी इक्लेस्टोन, अन्या श्रुबसोले, केट क्रॉस.

असा आहे भारतीय महिला संघ

स्मृती मानधना, शफाली वर्मा, पुनम राउत, मिताली राज (कर्णधार), हरमनप्रित कौर, दिप्ति शर्मा, तानिया भाटिया (विकेट किपर), शिखा पांडे, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्रारकर, एकता बिस्ट

शफाली वर्माचे वनडे पदार्पणEsakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here