मुंबई – मनोरंजन जगतातील (entertainment world) एक महत्वाची बातमी आता समोर आली आहे. वास्तविक कोरोनाच्या काळातही अनेक सेलिब्रेटींनी लग्न केल्याच्या बातम्या आपण पाहिल्या आणि वाचल्या होत्या. त्यांनी त्यावेळी कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालनही केले होते. प्रसिद्ध कॉमेडियन सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले यांच्या लग्नाच्या वेळी त्यांनी कोविड नियमांचा भंग केल्याचे दिसून आले होते. आता चित्रपट सृष्टीतील एका दिग्दर्शकाच्या मुलीचे लग्न चर्चेत आलं आहे. (filmmaker shankar daughter aishwarya tie knot with rohit tamil nadu cm mk satlin attends)
प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक शंकर (tollywood directors) यांची मुलगी ऐश्वर्या (aishwarya weds rohit) आणि टीएनपीएल क्रिकेटर रोहित दामोदरन हे विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांनी निवडक व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये लग्न केल्याचे समोर आले आहे. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिनही हजर होते. त्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगल्याचे दिसत आहे. रविवारी हा शाही विवाहसोहळा पार पडला. कोरोनाचे संकट पाहता त्या विवाह सोहळ्याला मान्यवरांची संख्या मर्यादित होती.
फिल्ममेकर शंकर यांची मुलगी ऐश्वर्या ही डॉक्टर आहे. तर रोहित हा क्रिकेटर आहे. रोहित हा तामिळनाडू प्रिमिअर लीगमध्ये मदूराई पँथरकडून खेळतो. रोहितचे वडिल दामोदरन हे त्या टीमचे मालक आहेत. लग्नाच्या वेशभूषेत ते रोहित आणि ऐश्वर्या हे दोघेही कमालीचे सुंदर दिसत होते. ऐश्वर्यानं मरुन आणि गोल्डन कलरचा ड्रेस परिधान केला होता. त्यात ती सुंदर दिसत होती. रोहितनं व्हाईट कलरचा शेरवानी घातला आहे.

Also Read: ‘वन नाइट स्टँड’वरून ट्रोल करणाऱ्याला अभिनेत्रीचं उत्तर
ऐश्वर्या आणि रोहित या दोघांच्य़ाही चाहत्यांनी त्यांना मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा दिल्या आहेत. चेन्नईतील महाबलीपूरम मधील एका मोठ्या रिसॉर्टमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करुन हा मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. सध्या कोरोनामुळे अनेक कार्यक्रमांवर निर्बंध आणण्यात आले आहेत. लग्नसोहळ्यासाठी किमान 25 व्यक्तींची उपस्थिती असा नियम करण्यात आला आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता अनेक ठिकाणी मोठ्या संख्येनं लोकं लग्नसोहळ्यासाठी गर्दी करत असल्याचे दिसुन आले आहे.
Esakal