तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी शरिर योग्यरित्या हायड्रेटेड रहाणे खूप महत्वाचे आहे. डिहायड्रेशनमुळे आरोग्यासाठी अनेक समस्या उद्भवू शकतात जसे की, थकवा, डोकेदुखी, त्वचेची समस्या आणि स्नायूंना पेटके येणे इत्यादी. जास्त काळ डिहायड्रेशनमुळे आरोग्यास अवयव निकामी होण्यासारखे गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. बरेच लोक हायड्रेटेड राहण्यासाठी पाणी पित राहातात. चांगली गोष्ट ही आहे की, शरिराला दिवसभर हायड्रेटेड ठेवण्यासाठी फक्त पाणीच पित राहीले पाहिजे असे काही नाही या साठी आणखी सोपा आणि सगळ्यांना आवडेल असा एक मार्ग देखील आहे. यासाठी काही फळे आणि भाज्यां आहारात घेऊन देखील तुमच्या शरीराची पाण्याची गरज पूर्ण होऊ शकते.

टरबूज –

आपण खाऊ शकणार्‍या सर्वात हायड्रेटिंग पदार्थांपैकी एक म्हणजे टरबूज. टरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यातील कॅलरीचे प्रमाण खूप कमी आहे. टरबूजामध्ये लाइकोपीनसह अँटीऑक्सिडेंट्स भरपूर असतात तसेच टरबूजात 92 टक्के पाणी असते.

टोमॅटो-

टोमॅटोमध्ये पोषक जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. ही भाजी तुम्हाला केवळ हायड्रेटेडच ठेवत नाही तर बर्‍याच रोगांपासून तुमचे संरक्षण देखील करते. आपण टोमॅटो बर्‍याच प्रकारे खाऊ शकता – एकतर त्यांना स्प्राउट्समध्ये घाला किंवा आपल्या शरीरातील पाण्याचा पुरवठा राखण्यासाठी आपल्या सॅलडमध्ये घाला. टोमॅटोमध्ये पाण्याचे प्रमाण 94% आहे.

पालक-

पालकांमध्ये मॅग्नेशियम आणि इतर महत्वाची जीवनसत्त्वे आणि खनिजे जास्त असतात. हिरव्या भाज्या अत्यंत हायड्रेटींग, उष्मांक कमी आणि त्वचा, केस आणि हाडे आरोग्यासाठी चांगली असतात. पालक भाजीतील पाण्याचे प्रमाण 92 टक्के आहे. हे रक्ताची कमतरता देखील पूर्ण करते.

संत्री-

आपण एका संत्र्यामधून 118 मिली पाणी मिळवू शकते, एवढेच नाही तर यामध्ये फायबर व्हिटॅमिन-सी तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि वजन कमी करते सोबतच संत्री हृदयरोगासाठीही फायदेशीर आहे.

काकडी –

काकडीत तब्बल 95 टक्के पाण्याचे प्रमान असते. जे आपल्याला दिवसभर हायड्रेट ठेवते. तसेच त्वचेच्या समस्येपासून आपले रक्षण करण्यासोबतच त्याचा नियमित सेवन केल्यास तुमचे रक्तदाब कमी होऊ शकतो.

पीच-
पीचमध्ये 89 टक्के पाण्याचे प्रमाण असते. यासह हे फळ व्हिटॅमिन-ए, सी, बी, पोटॅशियम यासारख्या महत्त्वपूर्ण खनिजांनी समृद्ध आहे जे आपली प्रतिकारशक्तीला बळकट करते तसेच पाचन प्रणालीला बळकट करते. त्वचेच्या सर्व समस्यांमध्येही हे प्रभावी आहे.
खरबूज

खरबूज हे एक असे फळ आहे, जे शरिरासाठी अत्यंत पौष्टिक आहे आणि आपल्या आरोग्यास बरेच फायदे देते. 177 ग्रॅम खरबूजामध्ये 90 टक्के पाण्याचे प्रमाण असते जे आपल्याला दिवसभर हायड्रेट ठेवू शकते. त्यात असलेले फायबर आणि व्हिटॅमिन ए तुमची प्रतिकारशक्ती वाढविण्यात देखील मदत करते.

स्ट्रॉबेरी –

स्ट्रॉबेरीत वजनाच्या सुमारे 91% पाणी असते करण्यासाठी नियमितपणे पाण्याने होते. याव्यतिरिक्त स्ट्रॉबेरीत फायबर, अँटीऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन सी, फोलेट आणि मॅंगनीज यासह महत्त्वपूर्ण खनिजे शरीरास मिळतात.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here