नागपूर : सर्वांत स्मार्ट उपकरण म्हणजे आपला (brainstrong) मेंदू. आपण दिवसभर वेगवेगळे विचार, वेगवेगळी कामे करत असतो. याचाच अर्थ की, मेंदूचे ही वेगवेगळे भाग वेगवेगळ्या वेळी कामे करीत असतात. म्हणजे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे विचार आणि कार्य आपल्या मेंदूमध्ये सुरू असतात. मात्र, आपण अनेकदा काय केले हे विसरून जातो. अभ्यास केल्यानंतर काही लक्षात राहत नाही. किंवा थोडे काहीच आठवते. अनेकदा विसरल्यासारखे होते. तेव्हा तुम्ही या पद्धतीचा वापर करून मेंदू स्मार्ट (The simplest way and big advantage) करू शकता. (Let-the-brain-strong;-The-simplest-way-would-be-a-big-advantage)

मोठ्याने वाचल्यास आपल्याला अधिक लक्षात राहते. यामुळे स्मृती सुधारणे. हे मेंदूसाठी उपयुक्त आहे. अशाप्रकारे कोणतीही गोष्ट सहज लक्षात राहू शकते.
तुम्ही जे वाचत आहात किंवा ऐकत आहात त्याचे दृष्यमान (व्हिज्युअलायझेशन) करा. हा पर्याय स्मरणशक्ती वाढविण्याचा उत्तम मार्ग आहे.
खाली वेळात बुद्धिबळ आणि कोडी सोडवणाऱ्या गेमचा आनंद घ्या ज्या मेंदूचा उपयोग करता.
दररोज कमीत कमी १५ ते ३० मिनिट ध्यान करा. यामुळे तणाव दूर होण्यास मदत होते आणि मेंदू स्वस्थ राहतो.
योग केल्याने तणाव, चिंता, नैराश्यातून मेंदूला संरक्षण मिळते.
व्यायाम केवळ शरीरासाठीच नव्हे तर मनाच्या सामर्थ्यासाठी देखील उपयुक्त आहे.
रोज सात ते आठ तासांची पुरेशी झोप घ्या. दिवसा घेतलेली एक लहान डुलकी मनाला चांगला आराम देते.
गाणे ऐकणे मेंदूच्या पेशींमध्ये खूप प्रभावी आहे.
मेंदूला ८० टक्के पाणी मिळाले तर योग्यरीत्या कार्य करते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here