अभिनेत्री गायत्री दातार तिच्या वेगवेगळ्या लूक मधील फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते. नुकतेच तिने एका खास लूकमध्ये फोटोशूट केले आहे.या फोटोमध्ये गायत्रीने कुर्ता घातला आहे. तसेच तिने ऑक्साइडची रिंग देखील घातली आहे. गायत्रीने या फोटोला कॅप्शन दिले, ‘रंग बदल बदल के क्यूँ चहक रहे हैं दिन दुपहरियां… मैं जानू ना जानू ना जानू ना जानू ना’तर एका फोटोला गायत्रीने कॅप्शन दिले आहे,’आखोंके राज़ आंखे ही जाने… बया करती है जाने कितने फसाने..!’‘तुला पाहते रे’ या मालिकेमधून गायत्रीला विशेष लोकप्रियता मिळाली.