बाद फेरीतील चौथ्या सामन्यात रोनाल्डोच्या पार्तुगालला वर्ल्ड नंबर वन बेल्जियमकडून 1-0 असा पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे गत युरो चॅम्पियन असलेल्या संघाचा प्रवास नॉक आउट राउंडमधील पहिल्याच सामन्यात संपुष्टात आला.या सामन्यात गोल डागून रोनाल्डो संघाला पुढच्या फेरीत घेऊन जाईल, अशी त्याच्या चाहत्यांना आस होती. एका गोलसह विश्वविक्रम रचण्याचीही रोनाल्डोला संधी होती. मात्र विश्वविक्र तर दूर राहिलाच पण त्यांचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले. सामन्यानंतर रोनाल्डो आणि लुकाकू यांच्यातील मैत्रीची अनोखी झलक पाहायला मिळाली. टाईट फाईट आणि वातावरण ताईट असा सामना संपल्यानंतर दोघे एकमेकांच्या गळ्यात पडून मैत्रीला तोड नाही, असा संदेशच देताना दिसले. मैदानातील लढतीनंतर दोघांनी एकमेकांविषयी व्यक्त केलेला आदर खिलाडूवृत्ताची नमुना पेश करणारा असाच होता.