आयुक्‍त म्हणाले, रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई; महापौर म्हणाल्या, आयुक्‍तांची हुकुमशाही.

सोलापूर : सर्वसाधारण सभेचे कामकाज, शहरातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावणे, कर संकलनातून उत्पन्न वाढीच्या दृष्टीने सरसकट सर्वांची बदली करू नका, असे पत्र महापौरांनी आयुक्‍तांना (commissioner) दिले. मात्र, त्या पत्राला बगल देऊन आयुक्‍तांनी महापालिकेतील (municipal corporation) 194 लिपिकांच्या (194 clerks) सरसकट बदल्याचे आदेश काढले. नव्या ठिकाणी रुजू न झालेल्यांचा आढावा आज (सोमवारी) घेतला जाणार असून वशिलेबाजीतून खुर्ची न सोडणाऱ्यांची विभागीय चौकशी करून कारवाई करण्याचा इशारा आयुक्‍तांनी दिला आहे. (solapur commissioner has issued transfer orders for 194 clerks in the municipal corporation)

Also Read: सोलापूर चारनंतर ‘लॉक’! जाणून घ्या काय सुरू अन् काय बंद?

महापालिकेची सहा महिन्यांवर निवडणूक आली आहे. अशा परिस्थितीत सरसकट सर्वच विभागांमधील कर्मचाऱ्यांची बदली केल्यानंतर नव्याने येणाऱ्यांना त्या विभागाच्या कामकाजाची काहीच माहिती नसते. त्यांना काम शिकून घ्यायला वेळ लागणार आहे. त्यामुळे सर्वसाधारण सभा असो वा अकाउंट विभागातील कामकाजाला विलंब लागू शकतो. या पार्श्‍वभूमीवर निवडणुका होईपर्यंत सरसकट सर्वांची बदली न करता टप्प्याटप्याने कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्यात. कर संकलन विभागातील नव्या कर्मचाऱ्यांना करदात्यांची घरे माहिती नाहीत. त्यामुळे बिले पोहच करण्यासाठी त्यांना अडचणी येत असल्याचे गाऱ्हाणे त्यांनी महापौरांकडे मांडले आहे. त्याचा थेट परिणाम उत्पन्नावर होणार असून निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांना बदनाम करण्याचा हा डाव असून आयुक्‍तांनी बदल्यांमध्ये हुकुमशाही दाखवू नये, असा इशाराही महापौरांनी दिला आहे. त्यामुळे आता आयुक्‍तांविरूध्द सत्ताधारी (महापौर) असा संघर्ष पुन्हा एकदा सुरु होण्याची शक्‍यता आहे.

Also Read: सोलापूर जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे बंद

‘त्यांची’ विभागीय चौकशी करून कारवाई

वर्षानुवर्षे एकाच विभागातील खुर्चीला चिकटून बसलेल्या लिपिकांची परीक्षा घेतल्यानंतर त्यातील बहुतेकजण नापास झाले. त्यांच्या कामात सुधारणा व्हावी, एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे राहिल्याने त्यांच्या कामात सुधारणा झालेली नाही, असे आयुक्‍त पी. शिवशंकर यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आयुक्‍तांनी महापौरांनी पत्र देऊनही तब्बल 194 लिपिकांच्या बदल्यांचे आदेश काढले. दरम्यान, नगरसचिव व अकाउंट विभाग महापौरांच्या नियंत्रणात येत असल्याने या दोन्ही विभागातील कर्मचाऱ्यांच्या निवडणुका होईपर्यंत बदल्या करू नका, असे पत्र महापौर श्रीकांचना यन्नम यांनी आयुक्‍तांना दिले. मात्र, ते पत्र आयुक्‍तांपर्यंत पोहचलेच नाही. आयुक्‍तांनी सर्वांच्याच बदल्यांचे आदेश काढले आणि आता जे कर्मचारी कार्यमुक्‍त होऊन नव्या ठिकाणी नियुक्‍त झाले नाहीत, त्यांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी दिला आहे.

Also Read: सोलापूर विद्यापीठाची 5 जुलैपासून परीक्षा

बदल्यांची सद्यस्थिती

– मुख्य लिपिक : 10 सर्वजण झाले रूजू

– वरिष्ठ लिपिक : 25 पैकी सर्वजण झाले नव्या ठिकाणी रुजू

– लिपिक : 194 पैकी नगरसचिव वगळता 190 जण झाले कार्यमुक्‍त

– महापौरांच्या पत्रामुळे नगरसचिव विभागाने केले नाहीत चार लिपिक कार्यकार्यमुक्त

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here