‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री धनश्री कडगावकरच्या मुलाच बारसं नुकतंच पार पडलं.धनश्रीने सोशल मीडियावर मुलाच्या बारशाचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये पहिल्यांदाच धनश्रीच्या बाळाचा चेहरा पाहायला मिळतोय. धनश्रीने तिच्या मुलाचं नाव ‘कबीर’ असं ठेवलंय. धनश्रीने जानेवारी महिन्यात मुलाला जन्म दिला. धनश्रीने दुर्वेश देशमुखशी लग्न केलं आहे.