दोरीच्या उड्या मारणे ही अशी एक एक्सरसाइझ आहे. जी आपल्याला अति-थकवा न येऊ देता शरीराचे सर्व भाग क्रियाशील करते.

दररोज दोरीच्या उड्या मारल्याने हृदयाची क्षमता वाढते आणि या कार्यामुळे हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो.
रोज दोरीच्या उड्या मारल्याने वजनासह शरीरातील फॅटचे प्रमाण कमी होते आणि लठ्ठपणा (ओबेसीटी) कमी होतो.
रोज दोरीच्या उड्या मारल्याने आपले शरीर लवचिक बनते तसेच स्नायू मजबूत होते.
स्टॅमिना वाढविण्यासाठी दररोज दोरीच्या उड्या मारणे फायदेशीर मानले जाते.
शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यासाठीही दोरीच्या उड्या मारणे चांगले आहे.
जे लोक रोज न चुकता दोरीच्या उड्या मारतात त्यांची उंची लवकर वाढण्यास मदत होते.
रोज दोरीच्या उड्या मारल्यास, शरीरात हार्मोन्सचे संतुलन होते, ज्यामुळे तणाव आणि नैराश्यासारखी कोणतीही समस्या उद्भवत नाही.
तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत असल्यास, दररोज दोरीच्या उड्या मारणे हे फार प्रभावी ठरू शकते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here