दरवर्षी कश्मीरमधून संपूर्ण देशात सफरचंदाच्या ट्रकभरून निघाल्याचे चित्र पाहायला मिळते. मात्र मराठवाडा कायम दुष्काळी स्थिती असते. शिवाय तापमानही कायमच २५ ते ४० अंशापर्यंत राहते.

उस्मानाबाद : सफरचंदाची Apple बाग म्हटलं की जम्मू कश्मीरचे वैभव डोळ्यासमोर दिसते. मात्र जागजी (ता.उस्मानाबाद) येथील शेतकरी सावंत बंधूंनी सफरचंदाची बाग यशस्वी करून दाखवली आहे. मराठवाड्यासारख्या उष्ण प्रदेशात सफरचंदाची बाग Apple Crop In Marathwada म्हटलं की कोणालाही आश्चर्य वाटेल. मात्र सावंत कुटुंबीयांनी हा प्रयोग यशस्वी केल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. कश्मीरमध्ये Kashmir हिवाळ्यात शून्य अंश पेक्षाही कमी तापमान असते. अशा वातावरणात सफरचंद चांगलाच बहरतो, असा कमी तापमानाच्या प्रदेशातील कश्मीरच्या सफरचंदाचे एक वेगळे वैशिष्ट्य मानलं जातं. डॉक्टरही सफरचंद या फळाला प्राधान्य देतात. थंडहवेच्या ठिकाणी सफरचंदाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. दरवर्षी कश्मीरमधून संपूर्ण देशात सफरचंदाच्या ट्रकभरून निघाल्याचे चित्र पाहायला मिळते. मात्र मराठवाडा Apple producation in osmanabad कायम दुष्काळी स्थिती असते. शिवाय तापमानही कायमच २५ ते ४० अंशापर्यंत राहते. विशेष म्हणजे उन्हाळ्यात, तर तब्बल ४० वरून ४५ पर्यंत पोहचते. त्यामुळे उष्ण कटिबंधात सफरचंदाच्या फळाचे उत्पादन घेणे कठीणच बाब मानतात, असा परिस्थितीशी जुळवून घेत जिल्ह्यातल्या Osmanabad जागजी येथील सावंत बंधूंनी एक एकर शेतात सफरचंदाची बाग यशस्वी करून दाखवली आहे. जून २०१८ मध्ये एक एकर क्षेत्रावर २१० झाडांची लागवड केली. तर त्यासाठी लागलेली रोपे बाहेरच्या देशातून आयात करण्यात आली. नागपूरमधील Nagpur आयातदारांकडून रोपांची मागणी करण्यात आली. पानगळ ही एक बाब सफरचंदासाठी आवश्यक असल्याचे सावंत सांगतात. त्यासाठी इथ्रेल नावाचे औषध वापरण्यात आलं. गेल्या वर्षी यातील पिकांना चांगला बहर आला होता.apple producation in marathwada farmer brothers takes apple produce in osmanabad

जागजी (ता.उस्मानाबाद) येथील शेतकरी सावंत बंधूंनी सफरचंदाची बाग यशस्वी करून दाखवली आहे.

Also Read: Aurangabad Zill Parishad: आरोग्य विभागात ३२९ पदांची होणार भरती

मात्र प्रयोग म्हणून त्याची चाचणी केली. यंदा जानेवारीमध्ये फळधारणा झाली आहे. पुढील चार महिने म्हणजेच (जूनमध्ये) सध्या फळांची स्थिती चांगली आहे. एका एकरामध्ये सुमारे दोनशे दहा झाडांची लागवड झाली आहे. या प्रत्येक झाडावर पंधरा ते वीस किलोचे फळ मिळणे अपेक्षित आहे. उष्ण वातावरणात सफरचंद घेऊ शकतो. याचा यशस्वी प्रयोग सावंत कुटुंबियांनी यशस्वी करून दाखविला आहे. या अनोख्या प्रयोगाची पाहणी करण्यासाठी अनेक नागरिक त्यांच्या शेतावर भेट देत आहेत. तसेच त्याचे कौतुक करीत आहेत.

मराठवाड्यासारख्या उष्ण प्रदेशात सफरचंदाची बाग म्हटलं की कोणालाही आश्चर्य वाटेल.

Also Read: Osmanabad Rain Updates : उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाची हजेरी

पारंपरिक पद्धतीची शेती परवडत नाही. जे आपल्या भागात फळपिके बाहेरच्या प्रदेशातून येतात. अशा पिकांची लागवड करणे गरजेचे असते. त्यातुन शेतकऱ्यांना जास्तीचा आर्थिक फायदा होतो. आम्ही प्रथम ड्रॅगन फ्रूट हे फळ घेतले. त्यात यशस्वी झालो. त्यानंतर आता सफरचंदाचे उत्पादन घेतले आहे. त्यातही यशस्वी होत आहोत. त्यासाठी मेहनत, तंत्रज्ञान याचा वापर करावा लागतो. त्यात यशस्वी झालो आहोत. आमचे तिन्ही बंधू प्रमोद सावंत, राम सावंत, तानाजी सावंत याकडे स्वतः लक्ष देत असल्याने यशस्वी झालो आहोत.

– नितीन सावंत, शेतकरी, जागजी

सावंत बंधुंनी सफरचंदाचा प्रयोग केला आहे. सध्या फळ चांगल्या स्थितीत आहे. कलरही चांगला आहे. निश्चित त्यांचे काम कौतुकास्पद आहे.

– ज्ञानेश्वर जाधव, तालुका कृषी अधिकारी, उस्मानाबाद.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here