पुणे : पुण्यातील कचरावेचकांचे सन्मानासाठी आंदोलन जेष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या आज पुण्यात नेतृत्वाखाली करण्यात आलं आहे. ”कचरावेचकांच्या ‘स्वच्छ’ संस्था कोणाच्या हितासाठी बंद पाडली जात आहे?” असा सवाल त्यानी यावेळी उपस्थित केला.

गेली १५ वर्ष कष्ट सोसून पुण्याच्या कचरावेचकांनी उभ्या केलेल्या कचरा संकलन व्यवस्थेचे कंत्राटीकरण करण्याच्या चर्चेमुळे कचरावेचकांच्या उपजीविकेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. कोरोनाच्या काळात पूर्ण क्षमतेने काम करून सुद्धा कचरावेचकांना गरजेचे सुरक्षा साहित्य, आयुर्विमा, वैद्यकीय सहाय्य आणि प्रोत्साहन भत्ता मिळाले नाही.

जेष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली कचरावेचकांचे सन्मानासाठी आंदोलन करण्यात आलं. ”कचरावेचकांच्या ‘स्वच्छ’ संस्थेला ११५ नगरसेवक व ३२ लाख नागरिकांनी लेखी पाठिंबा दिला आहे, मग विरोध कोणाचा? ३५०० वेचक चालवत असलेली, रोज २ लाख किलो कचरा पुनर्निर्मितीस पाठवून शहराचे वार्षिक २१ कोटी रुपये वाचवणारी व्यवस्था कोणाच्या हितासाठी बंद पाडली जात आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here