लस बनावट आहे का किंवा कॅम्प खरा की खोटा कसं ओळखायचं यासाठी काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे.

गेल्या दीड वर्षापासून जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाची पहिली आणि दुसरी लाटही आली. यात कोरोनाचे नवे स्ट्रेन चिंता वाढवत आहेत. दुसरीकडे कोरोनाला रोखण्यासाठी जगभर लसीकरण मोहिम सुरु झाली आहे. भारतातही लसीकरणाचा वेग वाढला आहे. ताज्या आकडेवारीनुसार भारताने लसीकरणात अमेरिकेला मागे टाकलं आहे. मात्र, एक बाब चिंतेत भर टाकणारी आहे ती म्हणजे बनावट लसीकरण कँप आणि यामाध्यमातून होणारा घोटाळा. भारतात महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये बनावट लसीकरण शिबिरातून लस देण्यात आल्याचं समोर आलं आहे.

फक्त भारतातच नव्हे तर जगभरात अशा प्रकारचे लसीकरण घोटाळे झाले आहेत. मुंबईतील कांदिवली इथं एका लसीकरण कॅम्पमध्ये 300 हून जास्त जणांना लस दिली गेली. पण ज्यांना लस देण्यात आली त्यांच्यात लसीकरणामुळे होणारे परिणाम दिसलेच नाही. त्यानंतर याबाबत शंका उपस्थिती केली गेली. असाच प्रकार पश्चिम बंगालमध्ये झाला आहे. तिथे तृणमूलच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांनी लसीकरण घोटाळ्याचा आरोप केला. बनावट लस दिली गेल्याचं मिमी चक्रवर्ती यांनी म्हटलं. या प्रकरणी एकाला अटक केल्यानंतर अशी माहिती समोर आली की, कॅम्पमध्ये लसीऐवजी अँटिबायोटिक डोस देण्यात आला.

Also Read: लसीकरणात भारत अमेरिकेच्या पुढे, मोदींकडून अभिनंदन; चीन अव्वल

जगभरात बनावट लसीकरणाचे प्रकार

अमेरिका, मेक्सिको, पोलंड आणि चीनमध्येही वेगवेगळ्या पद्धतीने लसीकरणाचा घोटाळा झाला आहे. अमेरिकेत बनावट वेबसाइटच्या माध्यमातून लोकांना लुटण्यात आलं. जवळपास 25 हून अधिक संकेतस्थळांच्या माध्यमातून लसीकरणासाठी नोंदणी केली गेली होती. सरकारच्या निदर्शनास येताच या सर्व वेबसाइट बंद करण्यात आल्या. मेक्सिकोमध्ये फायजरची लस असल्याचं सांगून नकली डोस देण्यात आले. एका डोससाठी लोकांकडून 100 डॉलरपर्यंत रक्कम उकळण्यात आली. तर पोलंडमध्ये लोकांना त्वचेवरील सुरकुत्या घालवणाऱ्या औषधाचे पाणी देण्यात आलं. चीनमध्ये पोलिसांनी बनावट लस देणाऱ्या टोळीवर कारवाई केली असून 80 जणांना ताब्यात घेतलं.

Also Read: कोरोना लस घेतल्यावर पॅरालिसिस झाला बरा; रुग्णाचा दावा

vaccination

लसीकरण बनावट तर नाही ना?

लस बनावट आहे का किंवा कॅम्प खरा की खोटा कसं ओळखायचं यासाठी काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण लस घेतो तेव्हा 5 मिनिटांमध्येच त्याबाबतचा मेसेज मिळतो. तसंच एका तासात कोविन पोर्टलवरून सर्टिफिकेटसुद्ध मिळतं. जर ते मिळालं नाही तर त्याची चौकशी करा. मुंबईत कांदिवलीतील लसीकरणावेळी लस घेतलेल्यांना उशिराने सर्टिफिकेट मिळाले होते. लसीकरणानंतर मिळालेल्या सर्टिफिकेटची सत्यता पडताळून पाहा. त्यावर असलेल्या क्यूआर कोडवरून सर्व माहिती मिळते. जर त्यामध्ये काही चुकीचं आढळलं तर त्याची तात्काळ तक्रार करा.

लस घेण्यासाठी सरकारी केंद्रावर जाऊ शकता. जर तुम्ही खासगी रुग्णालयात जात असाल तर ते अधिकृत आहे की नाही चेक करा. कोविन पोर्टलवरून त्याची माहिती मिळते. लस घेतल्यानंतर तुम्ही अँटिबॉडी टेस्ट करू शकता. लस खरी असेल तर तुमच्या शरिरात अँटिबॉडी आढळतील.

Corona Vaccine

बनावट लस कशी ओळखायची?

तुम्हाला ज्या बॉटलमधील लस दिली आहे त्यावरूनही लस खरी की बनावट हे ओळखता येतं. खालील गोष्टींवरून लस बनावट असल्याचं ओळखता येतं.

  • बाटलीवर असलेलं लेबल नीट नसेल किंवा ते नसल्यास

  • लेबलवर स्पेलिंगमध्ये गडबड, चुकीचे स्पेलिंग, नाम साधर्म्य असण्याची शक्यता

  • लेबलवर एक्सपायरी डेट आणि स्टोरेज इन्फर्मेशन नसल्यास

  • लसीची बाटली जुनी किंवा त्यावर स्क्रॅचेस असण्याची शक्यता

  • लसीच्या बाटलीचे टोपण पुन्हा पॅक केले असल्यासारखं दिसत असेल

  • लसीऐवजी बाटलीमध्ये ग्लूकोजच्या पाण्यासारखं काही तरंगत असल्यास

Also Read: Covid Vaccination: लस घेण्यापूर्वी पाणी प्यावं का?

फसवणूक टाळण्यासाठी काय करायचं?

लसीकरणासाठी रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून फसवणूक केली जाते. लोकांना रजिस्ट्रेशनसाठी मेसेजमध्ये लिंक पाठवली जाते. त्यावर क्लिक करताच अॅप ओपन होते आणि अॅपच्या माध्यमातून डेटा चोरला जातो. लसीकरणासाठी कोविन अॅप किंवा पोर्टलवरूनच रजिस्ट्रेशन करा. भारत सरकारने लसीकरणासाठी आवश्यक ती सर्व सुविधा या पोर्टलवरून दिली आहे.

cowin

रजिस्ट्रेशनसाठी तुमच्या मोबाइलवर एक ओटीपी येतो. तो कोणासोबत शेअर करू नका. तसंच लसीसाठी स्लॉट बूक केल्यानंतर येणारा ओटीपी लस घेण्याआधी आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगावा लागतो. कोविन पोर्टलवर एका नंबरवरून चार जणांचे रजिस्ट्रेशन होऊ शकते.

कोविन पोर्टल – https://www.cowin.gov.in/home

कोविन अॅप डाउनलोड – https://play.google.com/store/apps/details?id=com.cowinapp.app

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here