ज्या पद्धतीने आपण घराची स्वच्छता करत असतो तशीच स्वच्छता टॉयलेट आणि बाथरुमची करणंदेखील गरजेचं आहे. कारण, अनेक आजारांचा प्रसार टॉयलेट किंवा बाथरुमच्याच माध्यमातून होत असतो. त्यामुळे या दोन्ही ठिकाणांची स्वच्छता राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणूनच, टॉयलेटमध्ये पडलेले हट्टी डाग दूर करण्याचे घरगुती उपाय कोणते ते पाहुयात.
कोल्ड ड्रिंक्स –
कोल्ड ड्रिंक हा पिण्याचा पदार्थ असला तरीदेखील त्याचा वापर टॉयलेट स्वच्छ करण्यासाठीही केला जातो. कोल्ड ड्रिंकमध्ये असलेल्या सोड्यामुळे टॉयलेटवर असलेले हट्टी डाग काढण्यास मदत होते. त्यासाठी कोल्ड ड्रिंक संपूर्ण टॉयलेटमध्ये टाकावं आणि अर्ध्या तासाने ब्रशच्या सहाय्याने स्वच्छ घासून घ्यावं. त्यामुळे टॉयलेटवर असलेले डाग सहज निघतात.
गरम पाणी –
कोणताही डाग असला तरीदेखील तो गरम पाण्याने लगेच स्वच्छ होतो. हाच प्रयोग टॉयलेटच्या बाबतीतही लागू होतो. गरम पाणी टॉयलेट व आजूबाजूच्या परिसरात टाकून ब्रशने स्वच्छ घासून घ्या. परंतु, पाणी जास्त गरम घेऊ नका. त्यामुळे टॉयलेट खराब होण्याचीही शक्यता असते.
बेबी ऑईल –
टॉयलेट स्वच्छ केल्यानंतर तुम्ही टॉयलेट सीट, हॅण्डल,टॅक किंवा अन्य गोष्ट बेबी ऑईलचा वापर करुन स्वच्छ पुसून घेऊ शकता. त्यामुळे वस्तूंची चमक वाढेल व त्यावर लवकर डागही पडणार नाहीत.
व्हिनेगर –
व्हाइट व्हिनेगरच्या माध्यमातूनही टॉयलेट स्वच्छ करता येतं. व्हाइट व्हिनेगर १ तास टॉयलेटमध्ये टाकून ठेवावं त्यानंतर ब्रशच्या सहाय्याने स्वच्छ घासून घ्यावं. त्यामुळे टॉयलेटमध्ये असलेले जुने डागदेखील दूर होतात. तसंच व्हिनेगरच्या सहाय्याने तुम्ही बाथरुम, बेसिन किंवा सिंकदेखील स्वच्छ करु शकता.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here