अशा परिस्थितीत कोरोनाने चिंता वाढविली असून शेतमाल पिकला, परंतु बाजारात मागणी अभावी उत्पादन खर्चही निघाला नाही, अशी अवस्था झाली आहे.

सोलापूर : राज्यातील अंदाजित 27 लाख शेतकऱ्यांनी (farmers) दोन लाखांवरील कर्जमाफीच्या प्रतीक्षेत बॅंकांचे कर्जच (loans) भरलेले नाही. त्यामुळे बॅंकांकडून आता वारंवार कर्जमाफीवर अवलंबून राहिलेल्या (दोन्ही कर्जमाफीचा लाभ घेतलेले शेतकरी) शेतकऱ्यांना कर्ज (loans) मिळत नसून केवळ जुन्यांचेच कर्ज नवे-जुने करून वाटपाची रक्‍कम फुगवली जात असल्याची चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोना काळात कुटुंबातील अडचणी सोडविण्याच्या हेतूने राज्यातील सात लाख 87 हजार शेतकऱ्यांनी खासगी सावकारांकडून (private lenders) एक हजार 615 कोटी 87 लाखांचे कर्ज (loans) घेतल्याचे समोर आले आहे. (eight lakh farmers in maharashtra have taken loans from private lenders)

Also Read: सोलापूर चारनंतर ‘लॉक’! जाणून घ्या काय सुरू अन् काय बंद?

अवकाळी, अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ अशा विविध संकटांचा सामना करूनही बळीराजाच्या पिकांना हमीभाव मिळालेला नाही. तर दुसरीकडे नैसर्गिक संकटांमुळे कर्जाची वेळेत परतफेड करता न आल्याने बॅंकांनीही कर्ज देणे बंद केले आहे. तसेच मागील दोन्ही कर्जमाफीचा लाभ घेतलेले काही शेतकरी आहेत. बहुतेक शेतकऱ्यांनी बॅंकांकडून कर्ज घेतल्यानंतर पुन्हा कर्जमाफी होईल म्हणून कर्जच भरलेले नाही. अशा शेतकऱ्यांची यादी तयार करून बॅंकांनी त्यांना कर्जवाटप करताना हात आखडता घेतल्याची तथा कर्जवाटपच केले नसल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत कोरोनाने चिंता वाढविली असून शेतमाल पिकला, परंतु बाजारात मागणी अभावी उत्पादन खर्चही निघाला नाही, अशी अवस्था झाली आहे.

Also Read: आयुक्‍तांनी बाजूला ठेवले महापौरांचे पत्र! कर्मचारी बदल्यावरून पेटला वाद

खते-बियाणांची उधारी, कुटुंबातील मुलांचे शिक्षण, मुला-मुलीचे लग्न, उदरनिर्वाहाचा खर्च करण्यासाठी त्यांना खासगी सावकारांचा दरवाजा ठोठावा लागला आहे. राज्यात मागील वर्षभरात जवळपास सोळाशेहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून त्यात अमरावती, नागपूर विभाग अव्वल राहिला आहे. तर दुसरीकडे खासगी सावकारांकडून कर्ज घेण्यातही हेच विभाग राज्यात पुढे असून कोल्हापूर विभागातील 87 हजार 722 तर पुणे विभागातील 48 हजार 783 शेतकऱ्यांनी खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन अडचणीतून मार्ग काढल्याचेही सहकार विभागाकडून सांगण्यात आले.

Also Read: सोलापूर विद्यापीठाची 5 जुलैपासून परीक्षा

परवानाधारक खासगी सावकारांनी एप्रिल 2020 ते मार्च 2021 या काळात एक हजार 615 कोटींचे कर्जवाटप केले आहे. अमरावती, नागपूर, कोल्हापूर विभागात सर्वाधिक कर्जवाटप झाले आहे.

– प्रदिप बरगे, उपनिबंधक, खासगी परवानाधारक सावकारी, पुणे

Also Read: ‘या’ पंचसुत्रीमुळेच कमी झाली दुसरी लाट! सोलापूर कोरोनामुक्‍तीकडे

खासगी सावकारकीची सद्यस्थिती

एकूण खासगी सावकार : 11,823

वर्षातील कर्जवाटप : 1615.87कोटी

सावकारीचे कर्जदार शेतकरी : 7.87 लाख

अमरावती विभागतील कर्जदार : 2.48 लाख

नागपूर विभागातील कर्जदार : 2.24 लाख

(eight lakh farmers in maharashtra have taken loans from private lenders)

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here